Agriculture news in marathi; Group planning can only be beneficial: birajdar | Agrowon

गटशेतीच ठरेल फायदेशीर ः बिराजदार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 जुलै 2019

सोलापूर ः शेतकऱ्यांना वैयक्तिक शेतीपेक्षा एकमेकांच्या साह्याने उत्पादन, मार्केटिंग या सगळ्या पातळीवर योग्य ती संधी मिळण्याच्या दृष्टीने गटशेती फायदेशीर ठरेल, असे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी येथे व्यक्त केले. 

सोलापूर ः शेतकऱ्यांना वैयक्तिक शेतीपेक्षा एकमेकांच्या साह्याने उत्पादन, मार्केटिंग या सगळ्या पातळीवर योग्य ती संधी मिळण्याच्या दृष्टीने गटशेती फायदेशीर ठरेल, असे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी येथे व्यक्त केले. 

पुण्याच्या महाराष्ट्र राज्य छोट्या शेतकऱ्यांचा संघ यांच्यामार्फत केंद्रीय कृषी व्यापार संघाच्या योजनांच्या प्रचार व प्रसार व अंमलबजावणीसाठी सोलापूर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन  यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने कोरडवाहू संशोधन केंद्रात कार्यशाळा झाली. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी कृषी आयुक्त पांडुरंग वाठारकर, महाराष्ट्र जीवन्नोनती अभियान सोलापूरच्या प्रकल्प संचालिका मीनाक्षी मडिवाल, कंपनी सेक्रेटरी (सीएस) विक्रांत सुत्रावे, शेतकरी उत्पादन कंपनीचे प्रतिनिधी, शेतकरी गटातील महिला, बार्शीतील वरदायिनी महिला शेतकरी उत्पादन कंपनीचे सदस्य, भोसे ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी, येवती ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी, श्री. खंडोबा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी, सोलापूर ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी माळकवठा आदी सहभागी होते. 

श्री. बिराजदार म्हणाले, ‘‘शेतीच्या समस्यांत वरचेवर भर पडते आहे. रोज नवनवीन तंत्रज्ञान येते आहे. त्यामुळे एकट्याने शेती करणे अवघड झाले आहे. त्यावर गटशेती हाच पर्याय आहे. आत्माच्या माध्यमातून त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित यावे.’’ या कार्यशाळेत कृषी प्रक्रिया उद्योगासाठी बिनव्याजी भांडवल कर्ज योजना, शेतकरी उत्पादक कंपनीसाठी पतहमी निधी योजना याबाबत आत्माचे उपसंचालक मनोहर मुंडे यांनी मार्गदर्शन केले. जीवनोन्नती अभियानाच्या संचालिका मडिवाळ यांनी शेतकरी गटांना कृषी प्रक्रिया व विक्री व्यवस्था यावर मार्गदर्शन केले. कल्पक चाटी यांनी सूत्रसंचालन केले. परमेश्‍वर सुतार यांनी आभार मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विक्रम फुटाणे, प्रवीण भोसले, चिदानंद बिराजदार, युवराज बिराजदार, वैभव वीर यांनी परिश्रम घेतले. 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
दुष्काळी स्थितीत आश्‍वासक ठरणारे ‘...सध्याच्या दुष्काळी स्थितीत वा बदलत्या हवामानात...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
नाशिकमध्ये वांगी २७०० ते ५००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
बहुगुणी अन्‌ बहुपयोगी जवस जवसाच्या बियांचा वापर खाद्य तेल आणि औद्योगिक...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...
जळगाव बाजार समितीत धान्याचे लिलाव बंदचजळगाव  ः जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व...
बाजार सुधारणांपासून शेतकरी वंचितचशेतकरी आणि शेतीमालाला शोषित बाजार व्यवस्थेच्या...
कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर...धुळे  ः खानदेशात कांद्यासाठी प्रसिद्ध...
ग्रामविकासासाठी स्वतंत्र निधी, पाणी...महाराष्‍ट्रातील २८ हजार ग्रामपंचायतीपैकी २३ हजार...
मंडणगड : जंगली श्वापदांकडून भातशेतीचे...मंडणगड, जि. रत्नागिरी : शेतात तयार झालेल्या...