agriculture news in marathi Grow high yielding castor, gram: Shinde | Agrowon

अधिक उत्पादन देणारे एरंडी, हरभरा पिकवा : शिंदे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणारे एरंडी, हरभरा तसेच काळा, गुलाबी व कथ्या रंगाच्या गव्हाची लागवड करावी’’, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी केले.

नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणारे एरंडी, हरभरा तसेच काळा, गुलाबी व कथ्या रंगाच्या गव्हाची लागवड करावी’’, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी केले.

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकरी संघटनेचे जिल्ह्यात अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

बाभळी (ता. हदगाव) येथे शिवाजी शिंदे यांचा जिल्हाध्यक्ष निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलत होते. यावेळी भारतीय मानव कल्याण महासमितीचे तालुकाध्यक्ष नारायण पाटील, प्रा. बळिराम मुनेश्वर, बालाजी पाटील बाभळीकर, प्रल्हाद पाटील सूर्यवंशी, शंकरराव नरवाडे, राजू पाटील नरवाडे आदी उपस्थित होते. 

शिंदे, ‘‘कृषी विद्यापीठातील व कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक मंडळी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला सरकारची जोड मिळणे आवश्यक आहे. मागील दोन वर्षांपूर्वी कापसाच्या एचटीबीटी व आरआरबीटी या कापसाचे वाण आणले. परंतु, सरकारने शेतकऱ्यांना लावण्यास बंदी घातली. त्यामुळे कोणताही खर्च न करता एकरी २५ क्विंटल उत्पादन देणारे कापसाचे वाण लावता आले नाही. पण, शेतकरी संघटनेने आंदोलन करून छुप्या पद्धतीने बियाणे मिळवून लागवड केली. या वर्षीही नांदेड जिल्ह्यात दोन हजार एकरवर या कापसाची लागवड केली.’’ 

‘‘एरंडी बियाण्यावर बंदी नसली तरी या वाणाचा प्रसार करत नाही. ते काम शेतकरी संघटनेलाच करावे लागत आहे. याशिवाय अनेक खासगी कंपन्या जागतिक स्तरावर मान्यता असलेल्या अनेक पिकांच्या सुधारित वाणांची निर्मिती करत आहेत. परंतु, ते वापरण्याची परवानगी शासनाने द्यावी. तरच, या बियाण्यांची निर्मिती करून फायदा होईल. अशा सुधारित वाणांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तरच शेतीचे उत्पादन वाढून भारत देश प्रगतीकडे वाटचाल करील. यावर्षी केंद्र सरकारने शेतीक्षेत्रासाठी हात आखडता घेतला आहे. दरवर्षी देण्यात येणाऱ्या निधीतून कृषी क्षेत्रासाठी तीन टक्के कपात करण्यात आली आहे. सरकारने यात वाढ करायला पाहिजे’’, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...