बार्शीटाकळीत कांदा बियाणे उगवेना

कांदा बियाणे उगवले नसल्याबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तज्ज्ञांचा चमू तेथे जाऊन पाहणी करणार आहे. यात कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी आदींचा समावेश आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. -विजय अस्वार, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, अकोला
बार्शीटाकळीत कांदा बियाणे उगवेना
बार्शीटाकळीत कांदा बियाणे उगवेना

अकोला : पेरणी केल्यानंतर महिना उलटूनही ‘महाबीज’चे कांदा बियाणे उगवले नसल्याचा प्रकार बार्शीटाकळी तालुक्यात उघडकीस आला आहे. यामुळे नुकसान झाले असून भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी तक्रारीद्वारे केली आहे. 

बार्शीटाकळी तालुक्यातील शेलू येथील प्रकाश सहदेवराव काकड, रतिराम सखाराम काकड, श्रीराम रामकृष्ण काकड, शालिनी रामदास काकड या शेतकऱ्यांनी बार्शीटाकळी येथील कृषी सेवा केंद्रातून १८ डिसेंबर रोजी महाबीजचे कांदा बियाणे खरेदी केले. दुसऱ्याच दिवशी (ता.१९ डिसेंबर) त्याची पेरणी केली. मात्र गेल्या महिनाभराच्या काळात  बियाणे उगवले नाही. प्रकाश काकड यांचे किमान १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पंचायत समितीत दिलेल्या निवेदनातून केली. 

मागणीची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाबीजच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला.असेच नुकसान अन्य शेतकऱ्यांचेही झाली असल्याची तक्रार संबंधितांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com