Agriculture news in Marathi Growers are relieved by the increase in the price of herbal leaves | Agrowon

वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने उत्पादकांना दिलासा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 जून 2021

जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट, तेल्हारा तालुक्यात पापपिंपरी या वनौषधीची शेती केली जात आहे. यंदा पानपिंपरीला चांगला दर मिळत असून, सध्या हे दर प्रतिकिलो साडेपाचशे रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.

अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट, तेल्हारा तालुक्यात पापपिंपरी या वनौषधीची शेती केली जात आहे. यंदा पानपिंपरीला चांगला दर मिळत असून, सध्या हे दर प्रतिकिलो साडेपाचशे रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. यामुळे आगामी काळात आणखी दर वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

अकोला, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये सातपुड्याच्या पायथ्याला लागून असलेल्या तालुक्यांमध्ये पानपिंपरीची लागवड केली जाते. वेलवर्गीय हे पीक जोखमीचे असल्याने सर्वच शेतकरी लागवड करीत नाहीत. मात्र यात कुशलता आलेले शेतकरी आता या पिकाच्या लागवडीकडे वळत आहेत.

आधी विड्याच्या पानाचे उत्पादन घेणारे शेतकरी आता पानपिंपरीची लागवड करीत आहेत. या भागात उत्पादित होणारी पानपिंपरी स्थानिक खरेदीदारांच्या माध्यमातून मोठ्या व्यापाऱ्यांकडे जाते. त्यांच्याकडून औषधी कंपन्यांकडे पोहोचविले जाते. गेली पाच-सहा वर्षांपासून पानपिंपरीला तीनशे ते साडेतीनशे रुपयांदरम्यान प्रतिकिलोला दर मिळत आहे. 

सध्या कोरोनाचा प्रभाव पाहता व या पानपिंपरीला आयुर्वेदात महत्त्व असल्याने मागणीत सुधारणा झाली. शिवाय गेल्या हंगामात काही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन झालेले नसल्याने आता मागणी वाढली. परिणामी, पानपिंपरीचा दर ५८० रुपयांपर्यंत जाऊन पोचला. येत्या काळात हाच दर सहाशेवर पोहोचेल, असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. या पिकाच्या दरात तेजी टिकून राहू शकते, असे व्यापारी सांगत आहेत.
 


इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...
उजनीतून खरिपासाठी पहिले आवर्तन सोडणारसोलापूर ः उजनी धरणात आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...
कृषी सल्ला : दापोली विभागपावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...