agriculture news in marathi Growing response to ‘My plant, my responsibility’ in Solapur district | Agrowon

‘माझे रोप, माझी जबाबदारी’स सोलापूर जिल्ह्यात वाढता प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 जून 2021

सोलापूर : वन आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आयोजित ‘माझे रोप माझी जबाबदारी’ या अभियानास जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून चांगला प्रतिसाद लाभत आहे.

सोलापूर : ‘‘वन आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आयोजित ‘माझे रोप माझी जबाबदारी’ या अभियानास जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून चांगला प्रतिसाद लाभत आहे. वनविभागाकडे १७७ आणि सामाजिक वनीकरण विभागाकडे १० संस्थांनी आणि १३० वैयक्तिक नागरिकांनी २८ हजार रोपांची मागणी नोंदवली आहे’’, अशी माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.

‘‘जिल्ह्यातील वनाखालील क्षेत्र वाढावे, लोकांनी झाडे लावण्यासाठी सहभाग द्यावा, यासाठी वन विभागाने ‘माझे रोप, माझी जबाबदारी’ अभियान सुरू केले आहे. पाच जूनपासून हे अभियान सुरू आहे. शंभरहून अधिक रोपांची मागणी करणाऱ्या संस्था, संघटनांना त्यांच्यापर्यंत रोपे पोहोचविण्याची तयारी वन विभागाने केली आहे. यासाठी वनविभागाकडे १८८ संस्थांनी २८ हजार रोपांची मागणी केली आहे’’, असे पाटील यांनी सांगितले. 

या अभियानात देशी आणि स्थानिक प्रजातींची रोपे लावण्यावर भर दिला जाणार आहे. ज्या शासकीय यंत्रणांना वृक्ष लागवड करावयाची आहे. अशा यंत्रणांना रोपनिर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्यास त्यांना रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संध्याराणी बंडगर (९९२२९३७९८१), संजय भोईटे (९४२१५८४६१९) forestdepartment५june२०२१@gmail.com यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले. 

सवलतीच्या दरात रोपे

‘‘राज्यात १५ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान वन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या कालावधीत वन विभागातर्फे सवलतीच्या दरात रोपे पुरवण्यात येणार आहेत. सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमींना अल्पदरात रोपे उपलब्ध व्हावीत, या साठी वन महोत्सवाच्या कालावधीत सवलतीच्या दरात रोपे मिळतील. १५ जूननंतर सर्वसाधारण कालावधीत नऊ महिन्यांचे रोप (लहान पिशवीतील रोप) २१ रुपयांना, तर १८ महिन्याचे रोप (मोठ्या पिशवीतील रोप) ७३ रुपयांना देण्यात येते. परंतु वनमहोत्सवाच्या काळात नऊ महिन्यांचे रोप १० रुपयांना, तर १८ महिन्यांचे रोप ४० रुपयांना उपलब्ध असेल’’, असे पाटील यांनी सांगितले.


इतर बातम्या
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
पूर्व विदर्भात मुसळधार शक्य पुणे : कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर कराकोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  ...नाशिक : राज्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून,...
अमरावती जिल्हा परिषदेची सभा...अमरावती : पीकविमा भरपाई, समृद्धी महामार्गाच्या...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
दूधदरप्रश्‍नी वैजापूर बाजार समितीच्या...औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या...
खेडमध्ये बटाटा लागवडीस वेगचास, जि. पुणे : खेड तालुक्यात बटाटा लागवडीस...
स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात...आजरा, जि. कोल्हापूर : आजरा बाजारपेठेत स्थानिक...
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
पुणे बाजार समितीची ‘प्रादेशिक’ अधिसूचना...पुणे : पुणे बाजार समितीची निवडणूक टाळून सत्ता एका...
कांद्याची २५ दिवसांत विक्रमी अकरा लाख...नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात युरियाप्रश्नी प्रशासनाची धावपळजळगाव :  खानदेशात खरिपाला सुरवात होत असतानाच...
‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करापुणे ः राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय...
खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववतजळगाव :  खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५, ६ जुलै... मुंबई : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि...