Agriculture news in marathi Growing up in Solapur Dryness due to sun | Agrowon

सोलापुरात वाढत्या उन्हामुळे शुकशुकाट

शुक्रवार, 9 एप्रिल 2021

सोलापूर शहर जिल्हयात सध्या उष्ष्णतेची लाट आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे उष्णतेच्या लाटेमुळे दुपारच्या वेळी सोलापूर शहरातील रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. 

सोलापूर ः सोलापूर शहर जिल्हयात सध्या उष्ष्णतेची लाट आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे उष्णतेच्या लाटेमुळे दुपारच्या वेळी सोलापूर शहरातील रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. 

दिवसाच्या कमाल तापमानात गेलया आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली आहे. सध्या सोलापूर येथील तापमान  ४० अंश सेल्सिअसपक्षा अधिक असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे दुपारीच्या वेळेस रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात बदल झालेला दिसून येत आहे.

सकाळच्या सत्रात अचानक ढग येत आहेत. त्यामुळे उकाडा जाणवत आहे. निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाच्या स्थितमुळे तापमानात मागील आठवड्यात मोठी वाढ झाली होती. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे गेला होता. दुपारच्या वेळेस जास्त उन्हाच्या झळा राहत असल्याने, अनेक जण सकाळी सत्रातच काम आटोपून घेत असताना दिसून येत आहेत.

वाढत्या तापमानामुळे सोलापूर शहरातील विहीरीत पोहण्यासाठी मुलांची गर्दी होताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने अनेक नागरिक आता दुपारच्या वेळेत घराच्या बाहेर पडत नाहीत. दोन दिवसानंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता असून, यामध्ये आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...