agriculture news in marathi, Growth Economy to improve: Dr. Panchbhai | Agrowon

निर्यातीमुळे सुधारेल ग्रामीण अर्थकारण : डॉ. पंचभाई

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मार्च 2019

नागपूर : भाजीपाला उत्पादक भूगावमधून निर्यातीला भरपूर वाव आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न केल्यास निश्‍चितच गावात मोठे आर्थिक परिवर्तन शक्‍य होईल, असा विश्‍वास नागपूर कृषी महाविद्यालयाचे सहयाेगी अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई यांनी व्यक्‍त केला. 

भारत सरकारच्या हिल (इंडिया) कंपनीद्वारे ''कीटकनाशकांचा सुरक्षित वापर'' या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. हिल (एच.आय.एल.) इंडियाचे व्यवस्थापक (बियाणे) अनिल यादव, कृषी विकास अधिकारी पी. डी. देशमुख, कृषिक्रांती कृषी सेवा केंद्राचे संचालक ओम जाजोदिया उपस्थित होते. 

नागपूर : भाजीपाला उत्पादक भूगावमधून निर्यातीला भरपूर वाव आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न केल्यास निश्‍चितच गावात मोठे आर्थिक परिवर्तन शक्‍य होईल, असा विश्‍वास नागपूर कृषी महाविद्यालयाचे सहयाेगी अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई यांनी व्यक्‍त केला. 

भारत सरकारच्या हिल (इंडिया) कंपनीद्वारे ''कीटकनाशकांचा सुरक्षित वापर'' या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. हिल (एच.आय.एल.) इंडियाचे व्यवस्थापक (बियाणे) अनिल यादव, कृषी विकास अधिकारी पी. डी. देशमुख, कृषिक्रांती कृषी सेवा केंद्राचे संचालक ओम जाजोदिया उपस्थित होते. 

डॉ. पंचभाई म्हणाले, `'भाजीपाल्यावर रासायनिक फवारणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. ती टप्याटप्याने कमी करण्याची गरज आहे. पिकांमध्ये रसायनाचा अंश कमी असल्यास त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी राहते. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे. व्यापक जागृती झाल्यास आणि सुरक्षा साधनांचा स्वयंस्फूर्तीने वापर वाढल्यास फवारणी दरम्यान होणाऱ्या विषबाधेच्या प्रकारावर नियंत्रण मिळविता येईल.'`

अनिल यादव यांनी कीटकनाशकाची खरेदी, हाताळणी, साठवणूक, फवारणी अशा विविध टप्प्यांवर घ्यावयाच्या काळजीविषयी सांगितले. देशमुख यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. जाजोदीया यांनी कापूस उत्पादकता वाढीसाठीचे पूरक तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन गणेश वरठी यांनी केले. या वेळी शेतकऱ्यांना भेंडी बियाणे व सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले.


इतर बातम्या
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...