‘जलयुक्त’मुळे साठवण क्षमतेत वाढ ः गुलाबराव पाटील

‘जलयुक्त’मुळे साठवण क्षमतेत वाढ ः गुलाबराव पाटील
‘जलयुक्त’मुळे साठवण क्षमतेत वाढ ः गुलाबराव पाटील

परभणी ः परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत निवड झालेल्या ५८२ गावांपैकी ४१९ गावशिवारांमध्ये जलसंधारणाची १० हजार ८३९ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांमुळे ६६ हजार ४०३ टीसीएम साठवण क्षमता निर्माण झाली आहे. या कामांवर सुमारे १५७ कोटी ७९ हजार रुपये निधी खर्च झाला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी (ता. २६) परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर श्री. पाटील बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्‍ज्वला राठोड, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार मोहन फड, महापौर मिनाताई वरपुडकर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भावनाताई नखाते, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी., आयुक्त रमेश पवार, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे आदींची उपस्थिती होती.

या वेळी शहीद जवान शुभम मुस्तापरे यांच्या वीरमाता श्रीमती सुनिता मुस्तापुरे यांना १ हेक्टर २३ आर, शहीद बालाजी अंभोरे यांच्या वीरपत्नी श्रीमती अंजना अंभोरे यांना २ हेक्टर, शहीद अक्षय गोडबोले यांच्या वीरमाता श्रीमती सुनिता गोडबोले यांना २ हेक्टर आणि शहीद गणेश शहाणे यांच्या वीरपत्नी श्रीमती अनुराधा शहाणे यांना २ हेक्टर जमिनीचे वाटप पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती तसेच दिव्यांग व्यक्ती, खेळाडू, पोलिस, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा गौरव यावेळी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com