मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
बाजारभाव बातम्या
कोल्हापुरात टोमॅटोच्या आवकेत वाढ
कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत मोठी वाढ झाली. टोमॅटोस दहा किलोस ५० ते १५० रुपये दर होता.
कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत मोठी वाढ झाली. टोमॅटोस दहा किलोस ५० ते १५० रुपये दर होता.
वांग्याच्या आवकेतही चांगलीच वाढ होती. वांग्याची दररोज एक हजार ते अकराशे कॅरेट आवक होती. त्यांना दहा किलोस ५० ते ३५० रुपये दर होता. मिरचीची एक हजार पोत्यापर्यंत आवक होती. ओल्या मिरचीस दहा किलोस १०० ते २५० रुपये दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची पाचशे ते सहाशे पोती आवक होती. तिला दहा किलोस १०० ते ३५० रुपये दर मिळाला. गवारीची चारशे पोती आवक झाली. तिला दहा किलोस २०० ते ५०० रुपये दर होता. गेल्या पंधरवड्यापासून बहुतांश भाजीपाल्याची आवक वाढत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
पाऊस थांबल्यानंतर अनेक ठिकाणी भाजीपाल्याच्या नव्या लागवडी झाल्या. काही ठिकाणी पावसामुळे येणारे व्यवस्थापनातील अडथळे दूर झाले. यामुळेच हळूहळू भाजीपाल्याची आवक वाढत आहे. टोमॅटो, वांग्याच्या आवकेत सातत्यपूर्ण वाढ आहे. परिणामी दर ही काही प्रमाणात कमी झाले आहेत. कारली, भेंडी, गवार, वरणा आदी भाजीपाल्याची आवक पंधरवड्यापूर्वी अत्यंत कमी होती. आता ती समाधानकारक होत आहे. या शिवाय कोथिंबीर व मेथीच्या आवकेतही वाढ कायम आहे. कोथिंबिरीची तब्बल २५ ते ३० हजार पेंढ्यांची आवक आहे. कोथिंबिरीस शेकडा ६०० ते १६०० रुपये दर मिळाला. मेथीला शेकडा ५०० ते १००० रुपये दर होता.
मेथीच्या आवकेतही चांगलीच वाढ झाली. तिची दररोज सरासरी २५ हजार पेंढ्यांची आवक होती. या तुलनेत पालक, पोकळा, शेपूची आवक कमी राहिली. यां भाज्यांची केवळ चार ते पाच हजार पेंढ्या आवक होती. या भाज्यांना शेकडा २०० ते ३०० रुपये दर होता. फळांमध्येही बोरांची चांगली आवक झाली. बोरास किलोस १५ ते २५ रुपये दर मिळाला.
- 1 of 65
- ››