बैल सजावट साहित्य सजावटीवर ‘जीएसटी’चे सावट

बैल सजावट साहित्य सजावटीवर ‘जीएसटी’चे सावट
बैल सजावट साहित्य सजावटीवर ‘जीएसटी’चे सावट

नगर ः पावसाळ्याचे अडीच महिने उलटले, मात्र अजूनही पुरेसा पाऊस नसल्याचा गंभीर परिणाम पोळा सणावर झाल्याचे दिसत आहे. त्यातच यंदा बैल सजावटीच्या साहित्यावर बारा टक्के जीएसटी लावली जात असल्याने बैल सजावटीच्या साहित्याच्या दरात पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झालेली असून, विक्रीवर परिणाम झाला आहे. नगर जिल्ह्याच्या बहुतांश भागांत भाद्रपदी बैलपोळा साजरा केला जातो. शेतकऱ्यांच्या दृष्टीने दिवाळीपेक्षाही पोळा सणाला अधिक महत्त्व आहे. पाऊस आणि शेतसुगी चांगली असली, तर पोळ्याला उत्साह वेगळाच असतो. यंदा मात्र सलग दुसऱ्या वर्षी पाऊस नसल्याने बैलपोळ्याच्या सणावर दुष्काळाचे गंभीर सावट असल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे. बैलपोळ्याला सजावटीचे साहित्य हमखास खरेदी केले जाते. मात्र गेल्या वर्षापासून साहित्य खरेदीवरही परिणाम होताना दिसत आहेत. यंदा एक तर पाऊस नसल्याने दुष्काळाचे सावट आणि साहित्यावर बारा टक्के जीएसटी लावली असल्याने आपसूकच दरात वाढ झालेली आहे. त्याचा परिणाम खरेदी झाला असून, साधारण चाळीस टक्के विक्री कमी झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.    मानाच्या अंघोळीपासून वंचित  बैलासह दावणीच्या जनावरांना बैलपोळ्याला शेतकरी मानाची अंघोळ घालतात. गेल्या वर्षी पाऊस नव्हता, तशीच नव्हे तर त्यापेक्षा गंभीर परिस्थिती यंदा नगरमधील साधारण सात तालुक्यांत आहे. सलग दोन वर्षांपासून पाऊस नसल्याने पाणीपातळी उंचावली नाही. त्यामुळे गाव, तलाव, पाझर तलाव, नदी, विहिरी आणि शेवटचा पर्याय असलेले हातपंपही बंद आहेत. पिण्यासाठीच टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने गंभीर दुष्काळाचे सावट असलेल्या भागात बैलांसह जनावरांना सलग दुसऱ्या वर्षी मानाच्या अंघोळीपासून वंचित राहावे लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com