परभणीत गवार प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये

परभणीत गवार प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये
परभणीत गवार प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये

परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ९) गवारीची १० क्विंटल आवक होती. गवारीला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कारल्याची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. काकडीची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले. 

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले. चवळीची ५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ८ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ६०० ते १००० रुपये दर मिळाले. पालकाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची १२० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये दर मिळाले.

वांग्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ६५० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेट ३०० ते ७०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १८०० ते २५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. भेंडीची १६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १८०० ते २५०० रुपये दर मिळाले. 

फ्लॅावरची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. कोबीची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. मधुमकाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यामध्ये बीट रुटची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. मुळ्याची ६ हजार नग आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते ७०० रुपये दर मिळाले.पातीच्या कांद्यांची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले.लिंबांची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com