नाशिकमध्ये गवार ४००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल

Guar 4000 to 6000 rupees per quintal in Nashik
Guar 4000 to 6000 rupees per quintal in Nashik

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गवारीची आवक २१ क्विंटल झाली. तिला ४००० ते ६००० रुपये असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजारात वांग्यांची २२५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये असा दर होता. त्यास सरासरी दर १५०० राहिला. फ्लॉवरची आवक ४५९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते ८६० दर होता. सरासरी दर ६४२ राहिला. कोबीची आवक ९९६ क्विंटल झाली. तिला सरासरी ४१५ ते ६६० असा दर होता. सर्वसाधारण दर ५८५ राहिला. ढोबळी मिरचीची आवक ११८ क्विंटल झाली. तिला २१२५ ते ३०६० दर होता. सर्वसाधारण दर २८१० राहिला. 

भोपळ्याची आवक ९६१ क्विंटल होती. त्यास २०० ते ६६५ असा दर होता. सर्वसाधारण दर ३३५ राहिला. कारल्याची आवक २६४ क्विंटल झाली. त्यास १५०० ते २१२५ असा दर होता. दोडक्यांची आवक ७७ क्विंटल झाली. त्यांना १२५० ते १९६० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर १४६० राहिला. गिलक्यांची आवक ५८ क्विंटल होती. त्यास ८३५ ते १२५० दर होता. सर्वसाधारण दर १०४० राहिला.

भेंडीची आवक ५६ क्विंटल झाली. तिला २५०० ते ३७५० दर होता. सर्वसाधारण दर ३१२५ राहिला. डांगराची आवक १९ क्विंटल झाली. त्यास ८०० ते १२०० दर होता. सर्वसाधारण दर १००० राहिला. काकडीची आवक ११४४ क्विंटल झाली. तिला २५० ते ७०० असा दर होता. सर्वसाधारण दर ५०० राहिला. 

हिरव्या मिरचीची आवक ८२ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १४०० ते २५०० असा दर मिळाला.  सर्वसाधारण दर २१०० रुपये राहिला. लिंबांची आवक ३० क्विंटल झाली. त्यांना ५०० ते १५०० असा दर होता. सर्वसाधारण दर १००० राहिला. कांद्याची आवक १४८० क्विंटल झाली. त्यास १२०० ते ३१०० दर होता. सर्वसाधारण दर २२०० राहिला. बटाट्याची आवक १२८८ क्विंटल झाली. त्यास १००० ते १६५० दर होता. 

पेरूला २००० ते ३००० रुपये

फळांमध्ये पेरूची आवक १६ क्विंटल झाली. त्यास २००० ते ३००० दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० राहिला. डाळिंबांची आवक १३२ क्विंटल झाली. त्यांना ५०० ते ५००० रूपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० राहिला. केळीची आवक ११० क्विंटल झाली. तिला ५०० ते १०५० सर्वसाधारण दर मिळाला. सरासरी भाव ८०० होता. मोसंबीची आवक ८८ क्विंटल झाली. त्यास २००० ते ४००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० राहिला. बोरांची आवक १३४ क्विंटल झाली. त्यांना ९०० ते २३०० दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com