दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ताज्या घडामोडी
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजी
नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवडाभरात भाज्यांची आवक आणि दरातही सुधारणा चांगली राहिली. घेवडा, गवार, वांगी, भेंडीच्या दरात तेजी अधिक होती. भुसारमध्ये मात्र अजूनही फारशी आवक सुरू झालेली नाही, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.
नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवडाभरात भाज्यांची आवक आणि दरातही सुधारणा चांगली राहिली. घेवडा, गवार, वांगी, भेंडीच्या दरात तेजी अधिक होती. भुसारमध्ये मात्र अजूनही फारशी आवक सुरू झालेली नाही, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढत आहे. मागील आठवड्यात दर दिवसाला टोमॅटोची ३४ ते ४० क्विंटलची आवक होऊन प्रतिक्विंटलला १ हजार ते २ हजार, वांगीची १६ ते २५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार, फ्लॉवरची ३० ते ३५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ५ हजार, काकडीची २४ ते ३० क्विंटलची आवक होऊन १ ते २ हजार, गवारची ५ ते १० क्विंटलची ५ ते ७ हजार, घोसाळ्याची ६ ते १० क्विंटलची आवक होऊन २ ते ४ हजार, दोडक्याची २२ ते ३० क्विंटलची आवक होऊन २ ते ४ हजार ५००, कारल्याची २२ ते ३० क्विंटलची आवक होऊन २ ते ३ हजार ५०० रुपये, भेंडीची २३ ते २५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ५०० ते ४ हजार ५००, वालाची ६ ते १३ क्विंटलची आवक होऊन २ ते ४ हजार ५०० रुपयाचा दर मिळाला.
घेवड्याची आवक काहीशी कमी झाली असली तरी दरात मात्र तेजी कायम आहे. घेवड्याची १ ते ३ क्विंटलची आवक होऊन ६ ते ८ हजार रुपये क्विंटलला दर मिळाला. बटाट्याची आवक ३५० ते ४०० क्विंटलची आवक होऊन ३ ते ३ हजार ३०० रुपये, लसणाची ११ ते १५ क्विंटलची आवक होत असून ८ ते १२ हजार, हिरवी मिरचीची ३५ ते ४५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ५०० ते ३ हजार, आद्रकाची १५ ते २५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ५०० ते ४ हजार, शिमला मिरचीची २५ ते ३५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार रुपयाचा दर मिळाला. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर पालक, मेथी, कोंथिबीर, करडी, शेपू भाजीला चांगली मागणी राहिली आहे.
भुसारमध्ये मात्र आवक कमीच राहिली, ज्वारीची दर दिवसाला ३० ते ३५ क्विवंटलची आवक होऊन २ हजार ५०० ते ३ हजार रुपये प्रती क्विंटल, हरभऱ्याची ५० ते ६० क्विंटलची आवक होऊन ३ हजार ४०० ते ५ हजार ५०, मुगाची ७५ क्विंटलची आवक ३ हजार ५०० ते ७ हजार ७०० रुपये, सोयाबीनची ९० ते १०० क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ३ हजार ८५१ रुपयांची प्रतिक्विंटल दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.