agriculture news in marathi Guar, Ghewda and Okra continue to rise in Solapur | Agrowon

सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी कायम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात घेवडा, गवार, भेंडीला चांगला उठाव राहिल्याने त्यांच्या दरात पुन्हा तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात घेवडा, गवार, भेंडीला चांगला उठाव राहिल्याने त्यांच्या दरात पुन्हा तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची रोज दोन ते पाच क्विंटल, भेंडीची १० ते १५ क्विंटल आणि घेवड्याची एक ते दोन क्विंटल अशी आवक राहिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दरात आणि मागणीत सातत्याने चढ-उतार होत असला, तरी मागणी टिकून आहे. त्यामुळे दर तेजीत राहिले. या आधीच्या सप्ताहातही अशीच परिस्थिती होती. 

गवारीला प्रतिक्विंटलला किमान ३००० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये, भेंडीला किमान ६०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये तर घेवड्याला किमान ३५०० रुपये, सरासरी ४५०० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय टोमॅटो, वांग्याच्या दरातील तेजी या सप्ताहातही पुन्हा टिकून राहिली. त्यांची आवक ही १०० ते २०० क्विंटलपर्यंत राहिली. पण मागणीमुळे दर जैसे थे 
राहिले.

टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, वांग्याला १००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये दर मिळाला. भाज्यांनाही पुन्हा उठाव कायम राहिला. त्यातही मेथी, कोथिंबिरीच्या दरात तेजी राहिली.

भाज्यांची आवक प्रतिदिन प्रत्येकी दहा हजार पेंढ्यापर्यंत राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी १००० ते १७०० रुपये, कोथिंबिरीला ४०० ते १००० रुपये असा दर मिळाला. 

डाळिंबांनाही उठाव

गेल्या काही दिवसांपासून डाळिंबांच्या आवकेत मोठी घट झाली आहे. परिणामी, डाळिंबाला चांगला उठाव मिळतो आहे. डाळिंबांची आवक स्थानिक भागातूनच राहिली. डाळिंबांची रोज ५०० क्विंटल ते एक टनापर्यंत आवक राहिली. त्यांना प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ११ हजार रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.


इतर बाजारभाव बातम्या
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
नाशिकमध्ये वांग्यांना सरासरी ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...