कोल्हापुरात गवार दहा किलोस २०० ते ५०० रुपये

कोल्हापुरात गवार दहा किलोस २०० ते ५०० रुपये
कोल्हापुरात गवार दहा किलोस २०० ते ५०० रुपये

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात गवार, ओल्या वाटाण्याचे दर समाधानकारक होते. गवारीस दहा किलोस २०० ते ५०० रुपये दर होता. ओल्या वाटाण्याची चारशे ते पाचशे पोती आवक झाली. ओल्या वाटाण्यास दहा किलोस २०० ते ४०० रुपये दर मिळाला. कारल्याची दररोज चारशे ते पाचशे पाट्या आवक झाली. कारल्यास दहा किलोस १०० ते १५० रुपये दर होता. भेंडीची दीडशे ते दोनशे करंड्या आवक झाली. भेंडीस दहा किलोस ५० ते ३०० रुपये दर मिळाला. वरण्याची शंभर ते दीडशे पोती आवक झाली. वरण्यास दहा किलोस २०० ते ३०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची आवक या सप्ताहात वाढलेलीच राहिली. यामुळे दरात वाढ होऊ शकली नाही. टोमॅटोची दररोज दोन ते अडीच हजार कॅरेटची आवक झाली. टोमॅटोस दहा किलोस २० ते ६० रुपये दर होता. ओल्या मिरचीची ९०० ते १००० पोती आवक होती. ओल्या मिरचीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर मिळाला. घेवड्याच्या आवकेत या सप्ताहात घट झाली. घेवड्यास दहा किलोस १५० ते ३०० रुपये दर होता. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची तेरा ते चौदा हजार पेंढ्या आवक होती. कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ८०० रुपये दर होता. मेथीची १२ ते १३ हजार पेंढ्या आवक झाली. मेथीस शेकडा ३०० ते ७०० रुपये दर मिळाला. पालक, पोकळा, चाकवत आदी भाज्यांना शेकडा ६०० ते ८०० रुपये दर होता. फळांमध्ये डाळिंबाला किलोस २० ते ४० रुपये दर होता. पेरूची तीस ते चाळीस डाग आवक झाली. पेरूला डागास २०० ते ४०० रुपये दर होता. द्राक्षाची दीडशे ते दोनशे पाट्या आवक होती. द्राक्षाला किलोस १५ ते ३५ रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com