Agriculture news in marathi Guar in Kolhapur ten kilos 200 to 500 | Agrowon

कोल्हापुरात गवार दहा किलोस २०० ते ५०० रुपये

राजकुमार चौगुले
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात गवार, ओल्या वाटाण्याचे दर समाधानकारक होते. गवारीस दहा किलोस २०० ते ५०० रुपये दर होता. ओल्या वाटाण्याची चारशे ते पाचशे पोती आवक झाली. ओल्या वाटाण्यास दहा किलोस २०० ते ४०० रुपये दर मिळाला. कारल्याची दररोज चारशे ते पाचशे पाट्या आवक झाली.

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात गवार, ओल्या वाटाण्याचे दर समाधानकारक होते. गवारीस दहा किलोस २०० ते ५०० रुपये दर होता. ओल्या वाटाण्याची चारशे ते पाचशे पोती आवक झाली. ओल्या वाटाण्यास दहा किलोस २०० ते ४०० रुपये दर मिळाला. कारल्याची दररोज चारशे ते पाचशे पाट्या आवक झाली.

कारल्यास दहा किलोस १०० ते १५० रुपये दर होता. भेंडीची दीडशे ते दोनशे करंड्या आवक झाली. भेंडीस दहा किलोस ५० ते ३०० रुपये दर मिळाला. वरण्याची शंभर ते दीडशे पोती आवक झाली. वरण्यास दहा किलोस २०० ते ३०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची आवक या सप्ताहात वाढलेलीच राहिली. यामुळे दरात वाढ होऊ शकली नाही. टोमॅटोची दररोज दोन ते अडीच हजार कॅरेटची आवक झाली. टोमॅटोस दहा किलोस २० ते ६० रुपये दर होता. ओल्या मिरचीची ९०० ते १००० पोती आवक होती. ओल्या मिरचीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर मिळाला. घेवड्याच्या आवकेत या सप्ताहात घट झाली. घेवड्यास दहा किलोस १५० ते ३०० रुपये दर होता.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची तेरा ते चौदा हजार पेंढ्या आवक होती. कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ८०० रुपये दर होता. मेथीची १२ ते १३ हजार पेंढ्या आवक झाली. मेथीस शेकडा ३०० ते ७०० रुपये दर मिळाला. पालक, पोकळा, चाकवत आदी भाज्यांना शेकडा ६०० ते ८०० रुपये दर होता. फळांमध्ये डाळिंबाला किलोस २० ते ४० रुपये दर होता. पेरूची तीस ते चाळीस डाग आवक झाली. पेरूला डागास २०० ते ४०० रुपये दर होता. द्राक्षाची दीडशे ते दोनशे पाट्या आवक होती. द्राक्षाला किलोस १५ ते ३५ रुपये दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
खानदेशातील बाजार समित्यांत आवक सुरळीतजळगाव : खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील...
सोलापुरात बाजार समितीत भाजीपाला...सोलापूर ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभर...
कोल्हापूरमध्ये ‘कोरोना’चा...कोल्हापूर : कोरोनाच्या धसक्‍याने या सप्ताहात...
नागपुरात संत्रादरातील सुधारणा कायमनागपूर ः कोरोनामुळे ‘व्हिटॅमिन सी’ असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात २५ ते ३०...पुणे : ‘‘कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव...
औरंगाबादमध्ये संत्रा ५०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर ४०० ते ८०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्‍यात संत्रा ५०० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये...
सोलापुरात मेथी, कोथिंबिरीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हरभरा दर दबावातजळगाव ः खानदेशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन...
जळगावात गवार १८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.१७...
नाशिकमध्ये मिरची १००० ते ३००० रुपयेनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात संत्रा दरात सुधारणानागपूर ः उन्हाची तीव्रता वाढल्याच्या परिणामी...
नगरला चिंच, ज्वारीची आवक अजूनही कमीचनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अजूनही...
गाजर, मटार, पावट्याच्या दरात वाढपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लालबाग आंबा ८००० ते १००००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवगा १५०० ते २००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्‍यात घेवडा ५०० ते ३५०० रूपये...परभणीत ५०० ते १००० रुपये दर परभणी : येथील...
नाशिकमध्ये डाळिंब प्रतिक्विंटल ६५० ते...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...