सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना चांगला उठाव

सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, वांग्याला चांगला उठाव मिळाला. त्यांच्या दरात चांगली सुधारणा झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
Guar, Okra in Solapur, Eggplants stand up well
Guar, Okra in Solapur, Eggplants stand up well

सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, वांग्याला चांगला उठाव मिळाला. त्यांच्या दरात चांगली सुधारणा झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची दोन ते पाच क्विंटल, भेंडीची ८ ते १० क्विंटल आणि वांग्यांची १० ते १५ क्विंटलपर्यंत आवक राहिली. वास्तविक, मागणीच्या तुलनेत आवक कमीच होती. त्याचा परिणाम दरावर झाला आणि दरात सुधारणा झाली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दरात चढ-उतार सुरु आहे. या सप्ताहात मात्र बऱ्यापैकी दर मिळाले. 

गवारीला प्रतिक्विंटलला किमान एक हजार रुपये, सरासरी तीन हजार रुपये आणि सर्वाधिक पाच हजार रुपये, भेंडीला किमान एक हजार रुपये, सरासरी दोन हजार रुपये आणि सर्वाधिक चार हजार रुपये, तर वांग्याला किमान दीड हजार रुपये, सरासरी अडीच हजार रुपये आणि सर्वाधिक चार हजार रुपये असा दर  मिळाला. 

त्याशिवाय हिरवी मिरची, फ्लॅावर, घेवडा यांचे दर काहीसे स्थिर राहिले. त्यांची आवकही जेमतेम १५ ते २० क्विंटल अशी जेमतेमच राहिली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये, फ्लॅावरला किमान ६०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये तर घेवड्याला किमान २००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला. 

कोथिंबीर, शेपूला उठाव

गौरी पुजनात शेपूच्या भाजीला विशेष महत्त्व असल्याने या सप्ताहात शेपूला चांगला उठाव मिळाला. त्याशिवाय कोथिंबिरीलाही चांगली मागणी राहिली. त्यामुळे शेपूसह, कोथिंबीर, मेथीच्या दरात सुधारणा झाली. शेपूला शंभर पेंढ्यांसाठी ५०० ते १००० रुपये, मेथीला ७०० ते १००० रुपये आणि कोथिंबिरीला ८०० ते १२०० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

डाळिंबाचे दर स्थिर

डाळिंबाच्या आवक आणि दरातही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होतो आहे. या सप्ताहात मात्र डाळिंबाचे दर काहीसे स्थिर राहिले. डाळिंबांची आवक स्थानिक भागातूनच झाली. रोज अर्धा ते एक टनापर्यंत आवक राहिली. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक १२ हजार रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com