Agriculture news in marathi, Guar, Okra in Solapur, Eggplants stand up well | Agrowon

सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना चांगला उठाव

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021

सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, वांग्याला चांगला उठाव मिळाला. त्यांच्या दरात चांगली सुधारणा झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, वांग्याला चांगला उठाव मिळाला. त्यांच्या दरात चांगली सुधारणा झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची दोन ते पाच क्विंटल, भेंडीची ८ ते १० क्विंटल आणि वांग्यांची १० ते १५ क्विंटलपर्यंत आवक राहिली. वास्तविक, मागणीच्या तुलनेत आवक कमीच होती. त्याचा परिणाम दरावर झाला आणि दरात सुधारणा झाली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दरात चढ-उतार सुरु आहे. या सप्ताहात मात्र बऱ्यापैकी दर मिळाले. 

गवारीला प्रतिक्विंटलला किमान एक हजार रुपये, सरासरी तीन हजार रुपये आणि सर्वाधिक पाच हजार रुपये, भेंडीला किमान एक हजार रुपये, सरासरी दोन हजार रुपये आणि सर्वाधिक चार हजार रुपये, तर वांग्याला किमान दीड हजार रुपये, सरासरी अडीच हजार रुपये आणि सर्वाधिक चार हजार रुपये असा दर 
मिळाला. 

त्याशिवाय हिरवी मिरची, फ्लॅावर, घेवडा यांचे दर काहीसे स्थिर राहिले. त्यांची आवकही जेमतेम १५ ते २० क्विंटल अशी जेमतेमच राहिली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये, फ्लॅावरला किमान ६०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये तर घेवड्याला किमान २००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला. 

कोथिंबीर, शेपूला उठाव

गौरी पुजनात शेपूच्या भाजीला विशेष महत्त्व असल्याने या सप्ताहात शेपूला चांगला उठाव मिळाला. त्याशिवाय कोथिंबिरीलाही चांगली मागणी राहिली. त्यामुळे शेपूसह, कोथिंबीर, मेथीच्या दरात सुधारणा झाली. शेपूला शंभर पेंढ्यांसाठी ५०० ते १००० रुपये, मेथीला ७०० ते १००० रुपये आणि कोथिंबिरीला ८०० ते १२०० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

डाळिंबाचे दर स्थिर

डाळिंबाच्या आवक आणि दरातही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होतो आहे. या सप्ताहात मात्र डाळिंबाचे दर काहीसे स्थिर राहिले. डाळिंबांची आवक स्थानिक भागातूनच झाली. रोज अर्धा ते एक टनापर्यंत आवक राहिली. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक १२ हजार रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक, दर...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कोथिंबीर, मेथीचे दर पुन्हा...सोलापूर ः  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
नगरमध्ये वांगी, घोसाळ्यासह मेथी,...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
पुण्यात भाजीपाल्यांच्या दरात वाढ पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात कोथिंबिरीच्या दरात तेजी कायमनाशिकात क्विंटलला ७००० ते १८१०० रुपये नाशिक :...
नगरला दोडका, भेंडीच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्‍पन्न...
खानदेशात केळीला ११८० रुपये दरजळगाव ः खानदेशात केळीचे दर कमी अधिक होत आहेत....
औरंगाबादमध्ये कोबी, वांगी, आले दर स्थिरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात भाजीपाल्याचे दर तेजीत पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात टोमॅटो ५०० ते ५००० रुपये क्विंटलनांदेडमध्ये क्विंटलला ३००० ते ५००० रुपये...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याची मागणी...नाशिक: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात हिरव्या मिरची, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात रताळे, गुळाची आवक सुरुकोल्हापूर : येथील बाजार समितीत नवरात्रीच्या...
पुण्यात टोमॅटो, वांगी, शेवगा तेजीत पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात मोसंबी ८०० ते ४६०० रुपये...औरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते ३००० रुपये...
नाशिकमध्ये लवंगी मिरची सरासरी २१५०नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
तूर दरात ५० ते १०० रुपयांची सुधारणापुणे : मागणी वाढल्याने देशभरातील बाजार...