agriculture news in marathi Guar in the state is Rs. 1500 to 7000 per quintal | Agrowon

राज्यात गवार १५०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

पुणे ः वसुबारसेसाठीच्या धार्मिक कारणासाठी गवारीची मागणी वाढली आहे. त्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गवारीचे दर गुरुवारी (ता.१२) क्विंटलला ७ हजार रुपयांपर्यंत होते.

पुण्यात ५००० ते ७००० रुपये दर

पुणे ः वसुबारसेसाठीच्या धार्मिक कारणासाठी गवारीची मागणी वाढली आहे. त्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गवारीचे दर गुरुवारी (ता.१२) क्विंटलला ७ हजार रुपयांपर्यंत होते.

गेल्या दोन दिवसांपासून गवारीची मागणी वाढली. त्यामुळे दर ५ ते ७ हजार रुपये क्विंटल होते, अशी माहिती प्रमुख आडतदार विलास भुजबळ यांनी दिली. 

दिवाळीनिमित्त गुरुवारी गवारीची अवघी सुमारे ३ टेम्पो आवक होती. ही आवक सरासरी ५ टेम्पो एवढी असते. मात्र, सध्या आवक कमी आणि मागणी वाढल्याने दर वाढ झाली होती, असेही भुजबळ यांनी सांगितले.

गेल्या पाच दिवसांतील आवक (क्विटंल), दर 

दिनांक आवक दर
१२ १८१ ३ हजार ७०० ते ५ हजार
११ १२८ ३ हजार ते ६ हजार
१० १३८ साडेचार हजार ते ६ हजार
९  ८६ ४ हजार ते ७ हजार 
१६९ ४ हजा ते ७ हजार

जळगावात २००० ते ४००० रुपये दर

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.१२)  गवारीची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २००० ते ४००० व सरासरी ३००० रुपये, असे होते.

आवक जळगाव जिल्ह्यातील जामनेर, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड आदी भागांतून होत आहे. दर स्थिर आहेत. कूस असलेल्या गवारीला ४००० रुपये प्रतिक्विंटल दर आहे.

परभणीत ३५०० ते ५००० रुपये

परभणी ः येथील फळे - भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.१२) गवारीची १५ क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल किमान ३५०० ते कमाल ५००० रुपये, तर सरासरी ४२५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील उजळंबा, बोरवंड, कोक तसेच औरंगाबाद जिल्ह्यातून गवारीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी गवारीची ३ ते १५ क्विंटल आवक होती. त्यावेळी प्रतिक्विंटल ३५०० ते ७००० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता.१२) गवारीची १५ क्विंटल आवक झाली. त्यावेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये होते. किरकोळ विक्री ६० ते ८० रुपये किलो दराने  सुरु होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

सोलापुरात १५०० ते ४५०० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारीची आवक अगदी जेमतेम राहिली. पण, मागणी असल्याने गवारीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४५०० रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

गतसप्ताहात गवारीची आवक बाहेरील जिल्ह्यातून झाली. रोज सुमारे १० ते २० क्विंटल आवक राहिली. गवारीला  प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये दर मिळाला.

या आधीच्या सप्ताहातही आवक केवळ १० ते २० क्विंटलच्या आसपास राहिली. त्यावेळी प्रतिक्विंटलला किमान १२०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये असा दर मिळाला. १०० ते ५०० रुपयांच्या फरकाने दर काहिसे स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले.

सांगलीत ४००० ते ७००० रुपये

सांगली : ‘‘शिवाजी मंडईत गवारीची आवक वाढू लागली आहे. गुरुवारी (ता.१२) गवारीची आवक आठ ते दहा पोती (एक पोते ४० किलो) झाली. त्यास प्रतिदहा किलोस ४०० ते ७०० रुपये, तर सरासरी ५०० रुपये दर मिळाला’’, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

शिवाजी मंडईत जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे, आरग, बेडग यासह कवठेमंहाकाळ, वाळवा तालुक्यातून गवारीची आवक होते. बुधवारी (ता.११) गवारीची आवक १० ते १५ पोत्याची झाली. त्यास प्रतिदहा किलोस ५०० ते ७०० रुपये सरासरी ६०० रुपये असा दर मिळाला.

मंगळवारी (ता.१०) गवारीची आवक आठ ते दहा पोती झाली. त्यास प्रतिदहा किलोस ४०० ते ७०० रुपये, तर सरासरी ५०० रुपये असा दर होता. सोमवारी (ता.९) गवारीची आवक आठ ते दहा पोती झाली. त्यास प्रतिदहा किलोस ४०० ते ७०० रुपये, तर सरासरी ५०० रुपये दर मिळाला. चालू सप्ताहापेक्षा पुढील सप्ताहात गवारीच्या आवकेत वाढ होण्याची शक्यता असून दर स्थिर राहतील.

नाशिकमध्ये सरासरी ५००० रुपये दर

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.११) गवारीची आवक ६ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ६००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

सध्या गवारीची आवक अत्यंत कमी असल्याने उठाव कायम आहे. त्यामुळे दर स्थिर आहेत. मंगळवारी (ता. १०) गवारीची आवक ५ क्विंटल झाली. तिला ३५०० ते ६५००, सरासरी दर ५५०० रुपये होते. सोमवारी (ता.९) गवारीची आवक ४ क्विंटल झाली. तिला ३००० ते ७०००, तर सरासरी ५५०० रुपये होते. 

रविवारी (ता.८) गवारीची आवक ६ क्विंटल झाली. तिला २३०० ते ६५००, सरासरी दर ४५०० होते. शनिवारी (ता. ७) गवारीची आवक ८ क्विंटल झाली. तिला २८०० ते ७०००, सरासरी दर ५३०० होते. शुक्रवारी (ता.६) गवारीची आवक १३ क्विंटल झाली. तिला २५०० ते ७५००, सरासरी दर ५५०० होते.

गुरुवारी (ता.५) गवारीची आवक ९ क्विंटल झाली. तिला ५५०० ते ८५००, सरासरी दर ७५०० होते. मागील आठवड्यापासून बाजार समितीत गवारची आवक सर्वसाधारण होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून आवक घटली आहे. बाजारात होत असलेल्या आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे बाजारभावतही चढ-उतार दिसून आला.

औरंगाबादमध्ये सरासरी ३५०० रुपये दर

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१२) गवारची ५ क्‍विंटल आवक झाली. गवारीला सरासरी ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ९ नोव्हेंबरला १५ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीचे सरासरी दर २७५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७ नोव्हेंबरला १३ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला सरासरी ३२५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

८ नोव्हेंबरला गवारीची आवक ४ क्‍विंटल, तर सरासरी दर ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ९ नोव्हेंबरला ५ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीचे सरासरी दर ३७५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

दहा नोव्हेंबरला गवारीची आवक ४ क्‍विंटल झाली. सरासरी दर ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा मिळाला. ११ नोव्हेंबरला ४ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला सरासरी दर ३७५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

नगरमध्ये ५००० ते ६००० रुपये दर 

नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरूवारी (ता.१२) गवारीला प्रतिक्‍विंटल ५००० ते ६०००, तर सरासरी ५ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला.  

दिवसभरात गवारीची चार क्विंटलची आवक झाली. नगर बाजार समितीत अलीकडच्या काळामध्ये गवारीला चांगली मागणी आहे. तरीही आवक मात्र कमी होत आहे. मंगळवारी ता. १० रोजी ६  क्विटलची आवक होऊन प्रतिक्‍विंटल ५००० ते ६०००, सरासरी पाच हजार ५०० रुपयांचा दर मिळाला.

रविवारी ता. ७ रोजी ६ क्विंटलची आवक होऊन प्रतिक्‍विंटल ते ६००० व सरासरी पाच हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. नगर बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून गवारीचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात मेथी २५० ते ३००० रुपये शेकडासोलापुरात प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये सोलापूर...
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकूननाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाला आवक घटली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात मका दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
राज्यात बटाटा १००० ते २६०० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये...
नाशिकमध्ये भेंडीला सर्वसाधारण २९१० रुपयेनाशिक : ‘‘येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२...
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणानाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये तूर ४००० ते ५५०० रुपये...नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांदा दरात सुधारणा सुरूच आहे. दर...
औरंगाबादमध्ये मक्यासह तुरीचे दर स्थिरजालना : येथील बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ५ ते ९...
पुण्यात भोगीनिमित्त गाजर, मटारला मागणीपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत द्राक्षांना क्विंटलला ६०००...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९...
परभणीत शेवग्याला क्विंटलला ५००० ते ८०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
आंबिया संत्र्याला मिळाला २२ हजार...नागपूर : बाजारात संत्र्याचे दर गडगडले असतानाच...
राज्यात कांदा २०० ते ३५०० रुपयेसोलापुरात प्रतिक्विंटला २०० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये दोडक्याची आवक सर्वसाधारण;...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात मक्याची आवक कमीजळगावः खानदेशात प्रमुख बाजार समित्यांमध्ये...