Agriculture news in marathi Guar in the state is Rs.1000 to Rs.4000 per quintal | Page 2 ||| Agrowon

राज्यात गवार १००० ते ४००० रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 मे 2021

अकोलाः येथील भाजी बाजारात गुरुवारी (ता. ५) गवारीची ३००० ते ३५०० रुपये क्विंटल दराने विक्री झाली.

अकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये 

अकोलाः येथील भाजी बाजारात गुरुवारी (ता. ५) गवारीची ३००० ते ३५०० रुपये क्विंटल दराने विक्री झाली. बाजारात सध्या आवक अत्यंत कमी म्हणजे पाच क्विंटलच्याही आत झाली होती. ही आवक स्थानिक भागातील शेतकऱ्यांनीच केली होती.

लॉकडाऊनमुळे बाजाराच्या वेळांवर निर्बंध आले आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत शहरात किरकोळ विक्रीला परवानगी मिळाली आहे. या शिवाय मुख्य बाजारपेठेतील व्यवहार पहाटे तीन ते सहा यावेळेतच करण्याबाबत आदेश देण्यात आले. परिणामी, भाजीपाल्याच्या आवक तसेच विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. मे महिन्यात या काळात गवारीची आवक मोठ्या प्रमाणात होते.

शिवाय, दरही चांगला मिळतो. सध्या दर तर कमी आहेतच. शिवाय भावही सरासरी ३००० रुपये क्विंटल दरम्यान मिळतो आहे. किरकोळ विक्री ४५ ते ६० रुपये प्रतिकिलोने व्यापारी करीत आहेत.

कोल्हापुरात क्विंटलला १००० ते २५०० रुपये

कोल्हापूर : येथील बाजार समितीत दररोज गवारीची ४०० ते ५०० पोती आवक होत आहे. गवारीस दहा किलोस १०० ते २५० रुपये इतका दर मिळत आहे. गेल्या सप्ताहापासून दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सध्या उष्णता व ढगाळ हवामानामुळे गवारीचे व्यवस्थापन करताना अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गवारीची बहुतांशी स्थानिक बाजारपेठेत विक्री होत असल्याने मोठ्या शहरातील बाजारपेठा बंदचा गवारीच्या दरावर फारसा परिणाम झाला नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

नाशिकामध्ये क्विंटलला २००० ते ४००० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.५) गवारीची आवक १५ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० रुपये होते.

सध्या आवक सर्वसाधारण असल्याने उठाव कायम आहे. त्यामुळे दर स्थिर आहेत. मात्र आवकेसह दरातही चढ उतार दिसून आली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

मंगळवारी (ता.४) आवक १८ क्विंटल झाली. तिला १५०० ते ३५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० रूपये होते. सोमवारी (ता.३) आवक १४ क्विंटल झाली. तिला २००० ते ४००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० होते. रविवारी (ता.२) आवक ८ क्विंटल झाली. तिला २००० ते ४५०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० होते. शनिवारी (ता.१) आवक ९ क्विंटल झाली. तिला १८०० ते ४५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० होते. 

शुक्रवारी (ता. ३०) आवक १५ क्विंटल झाली. तिला १८०० ते  ४६०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० रुपये होते. गुरुवारी (ता.२९) आवक १३ क्विंटल झाली. तिला २००० ते ४५०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ३५०० रुपये होते.

औरंगाबादमध्ये क्विंटलला २५०० ते ३५०० रुपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ६) गवारीची १२ क्विंटल आवक झाली. तिला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान, तर सरासरी ३००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २९ एप्रिलला २० क्विंटल आवक झालेल्या गवारीचे सरासरी दर १२५० रुपये प्रतिक्विंटल होते. १ मेला ७ क्विंटल आवक झालेल्या गवारीला सरासरी २२५० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दोन मे रोजी १५ क्विंटल आवक झालेल्या गवारीचे सरासरी दर १ हजार ४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

तीन मे रोजी १२ क्विंटल आवक झालेल्या गवारीला सरासरी १२५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. चार मे रोजी गवारीची आवक नऊ क्विंटल, तर सरासरी दर २००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ५ मे रोजी २० क्विंटल आवक झालेल्या गवारीला सरासरी ३२५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

पुण्यात क्विंटलला २५०० ते ३५०० रुपये

पुणे  ‘‘गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ६) गवारीची सुमारे ५ टेम्पो आवक झाली. ही आवक पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून झाली होती. यावेळी १० किलोला २५० ते ३५० रुपये दर होता. आवक आणि दर सरासरी आहे,’’ असे ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी सांगितले. 

दरम्यान, कोरोना टाळेबंदीमुळे बाजार समितीमधील गाळे चक्राकार पद्धतीने सुरु आहेत. केवळ घाऊक खरेदीदारांना प्रवेश असल्याने शेतमालाची आवक आणि दर संतुलित असल्याचेही भुजबळ म्हणाले. 

परभणीत क्विंटलला १५०० ते ३००० रुपये

परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवारी (ता. ४) गवारीची १२ क्विंटल आवक होती. गवारीला प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल ३००० रुपये,  तर सरासरी २२५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. 

लॉकडाऊनमध्ये जिल्हा प्रशासनाने निर्बंध अधिक कडक केले. त्यामुळे फळे, भाजीपाला मार्केटमधील व्यवहार सुरु झाल्यानंतर मंगळवारी (ता. ४) स्थानिक  परिसरातील गावातून गवारीची १२ क्विंटल आवक झाली. त्यावेळी घाऊक खरेदीचे दर प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये होते.

परत निर्बंध लागू केल्यामुळे बुधवार (ता. ५) पासून व्यवहार बंद आहेत. गुरुवारी (ता. ६) शहरात फिरून विक्री करणारे किरकोळ व्यापारी प्रतिकिलो ५० ते ६० रुपये दराने गवारीची विक्री करत होते.

नांदेडला क्विंटलला १८०० ते २५०० रुपये 

नांदेड : नांदेड येथील इतवारा तसेच पूर्णा रोडवरील बाजारात सध्या गवारची आवक सर्वसाधारण आहे. गुरुवारी २५ क्‍विंटल गवारीची आवक झाली. यास १८०० ते २५०० रुपये दर मिळाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

सध्या लॉकडाउन असल्यामुळे भाजीपाला दरात स्थिरता आली आहे. ग्राहक नसल्यामुळे भाजीपाल्याचे दर कमी असल्याची माहिती मिळाली. सध्या इतवारा तसेच पूर्णा रोडवरील भाजीपाला बाजारात गवारची आवक सर्वसाधारण आहे. गुरुवारी गवारीची आवक २५ क्विंटल झाली. त्यास १८०० ते २५०० रुपये दर मिळाल्याची माहिती व्यापारी महम्मद जावेद यांनी दिली.

अकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये 

अकोला ः येथील भाजी बाजारात गुरुवारी (ता. ५) गवारीची ३००० ते ३५०० रुपये क्विंटल दराने विक्री झाली. बाजारात सध्या आवक अत्यंत कमी म्हणजे पाच क्विंटलच्याही आत झाली होती. ही आवक स्थानिक भागातील शेतकऱ्यांनीच केली होती. 

लॉकडाउनमुळे बाजाराच्या वेळांवर निर्बंध आले आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत शहरात किरकोळ विक्रीला परवानगी मिळाली आहे. या शिवाय मुख्य बाजारपेठेतील व्यवहार पहाटे तीन ते सहा या वेळेतच करण्याबाबत आदेश देण्यात आले. परिणामी, भाजीपाल्याची आवक, तसेच विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे.

मे महिन्यात या काळात गवारीची आवक मोठ्या प्रमाणात होते. शिवाय, दरही चांगला मिळतो. सध्या दर तर कमी आहेतच. शिवाय भावही सरासरी ३००० रुपये क्विंटल दरम्यान मिळतो आहे. किरकोळ विक्री ४५ ते ६० रुपये प्रतिकिलोने व्यापारी करीत आहेत. 


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नागपुरात सोयाबीन दरात तेजीनागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना...
चाकणच्या जनावरांच्या बाजारात ७० लाखांची...चाकण, जि. पुणे : येथील महात्मा फुले बाजार आवारात...
राज्यात जांभळांना ३००० ते १६००० रुपयेजळगावात क्विंटलला ६००० ते ९००० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याची आवक घटली; दरात...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात...
औरंगाबादमध्ये आंब्यांना सरासरी २४५० ते...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये आंब्यांचे...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लसूण ३५०० ते १२००० रुपयेपरभणीत क्विंटलला ५००० ते ६५०० रुपये परभणी...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार...
पुण्यात कांदा, बटाटा, घेवड्याच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लिंबू ६०० ते ३००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते २००० रुपये...
नागपुरात सोयाबीनला ७४०० रुपयांचा दरनागपूर : कळमना बाजार समितीत सोयाबीनमधील तेजी कायम...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात १० ते २०...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात हिरवी मिरची १००० ते ३००० रुपयेजळगावात क्विंटलला १८०० ते २८०० रुपये...
सोलापुरात डाळिंबाच्या दरात तेजी टिकूनसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा, मागणी...पुणे ः पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.१७)...
राज्यात कांदा १०० ते १५०० रुपयेसोलापुरात क्विंटलला १०० ते १००० रुपये सोलापूर...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...