Agriculture news in Marathi Guarantee shopping center delivery in state government court | Page 2 ||| Agrowon

हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून कापूस खरेदीचा निर्णय घेतल्याने सीसीआयकरीता सब एजंट म्हणून खरेदी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.

नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून कापूस खरेदीचा निर्णय घेतल्याने सीसीआयकरीता सब एजंट म्हणून खरेदी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. परिणामी मंगळवारी (ता. २६) संचालकांच्या बैठकीत खरेदीसंदर्भात ठराव घेऊन तो शासनाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून हमीभाव केंद्राचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टोलविण्यात येणार आहे.

कापसाची संततधार त्याच्या परिणामी कापसाची झालेली बोंडसड तर काही भागात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे कापसाची उत्पादकता कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशांतर्गंत प्रक्रिया उद्योगाची गरजही यातून भागणार नसल्याने सध्या कापसाच्या दरात तेजी आली आहे. हमीभाव ६०२५ रुपयांच्या तुलनेत कापसाला ७ हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. त्यामुळेच यंदा कापसाची आवक होणार नाही या शक्यतेमुळे सीसीआयने हमीभाव केंद्र न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. 

सीसीआयकरीता सबएजंट म्हणून पणन महासंघ खरेदी करतो. परिणामी पणन महासंघाच्या खरेदीवरबाबतही यामुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान पणन महासंघाच्या संचालक मंडळाची मंगळवारी (ता. २६) मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत यंदाच्या हंगामातील खरेदीवर मंथन होईल. बँक गॅरंटी तसेच शासन निधीची तरतूद झाल्यास हमीभावाने खरेदीचा निर्णय या बैठकीत होणार आहे. तशाप्रकारचा ठराव देखील संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली.

‘मुंबईत मंगळवारी महासंघाच्या संचालकांची बैठक आहे. यावेळी कापूस खरेदीबाबतचा ठराव घेऊन शासनाला पाठविण्याचे प्रस्तावित आहे. शासन त्यावर काय निर्णय घेते त्यानंतरच हमीभाव केंद्रांची स्थिती स्पष्ट होईल. सीसीआयने खुल्या बाजारातून खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पणन महासंघाला खरेदी करावयाची झाल्यास शासन निधी किंवा बँक गॅरंटीशिवाय शक्य होणार नाही. 
- अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ

खुल्या बाजारात कापसाचे दर अधिक आहेत. परिणामी हमीभाव केंद्रावर आवक कमी होईल, अशी शक्यता आहे. मात्र गरज पडल्यास शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत पणन महासंघाच्या माध्यमातून हमीभावाने खरेदी करेल. त्याबाबतचा निर्णय बाजारातील स्थिती पाहून घेण्यात येईल.  
- बाळासाहेब पाटील,  सहकार व पणन मंत्री

राज्यातील कापसाची खरेदी
२०१९-२०....

९३ लाख क्विंटल
२०२०-२१....
३७ लाख क्विंटल


इतर अॅग्रो विशेष
कंटेनर भाड्यात पाच पट वाढ नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात...
विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कापड उद्योगाला खुपतोय कापसाचा दर पुणे : तमिळनाडूतील राजकीय पक्ष तसेच कापड...
काँग्रेसचे सतेज पाटील, भाजपचे अमरिश...मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागा...
नाशिकमध्ये द्राक्ष परिषद घेणार : राजू...नाशिक : द्राक्ष पिकात शेतकरी कष्टातून उत्पादन घेत...
ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वीपुणेः देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या...
सुपारीची पाने, करवंटीपासून पर्यावरणपूरक...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता.वेंगुर्ला) येथील...
शेत ते बाजारपेठेपर्यंत युवकांची ‘...नाशिक येथील संगणक अभियंता अक्षय दीक्षित व...
शेतकऱ्यांच्या आंदोलनाने अहंकारी सत्तेला...पुणे : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर अंशत:...
कृषी सुधारणांचा अंत की पुनरुत्थान? :...केंद्र सरकारने पुन्हा एक समिती नेमून नव्याने...
शेतमजुरांना अपघात विम्याचे दोन लाखांचे...पुणे ः देशातील असंघटित कामगार व मजुरांना ई-...
पुढील लढाई तरुणांना लढावी लागेल : राकेश...केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द...
‘अन्न गुलामगिरी’ लादण्याचे षड्‌यंत्र :...केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेले तीन कृषी...
निसर्ग- वृक्षसंपदेचे वैभव जपलेले गमेवाडीनिसर्गाच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गमेवाडी...
सीताफळाने दिला शेतकऱ्यांना आधारऑगस्ट ते डिसेंबर कालावधीपर्यंत सातत्याने मागणी...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोकण, मध्य...
इथे नांदते गोकूळ सौख्याचे...कोल्हापूर जिल्ह्यातील नूल (ता. गडहिंग्लज) येथील...
उडीद, मुगाच्या उत्पादनात घट नांदेड : जिल्ह्यातील मूग, उडीद या खरिपातील...
पारदर्शक फोन : नव्या आभासी क्रांतीच्या...दर काही दिवसाने मोबाईल फोनमध्ये बदल होत असल्याचे...