Agriculture news in marathi, Guaranteed purchase of maize, sorghum and millet at nine centers in Nashik district | Page 2 ||| Agrowon

नाशिक जिल्ह्यात नऊ केंद्रावर मका, ज्वारी, बाजरीची हमीभावाने खरेदी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 सप्टेंबर 2021

येवला : हमीभावाने मका,ज्वारी, बाजरी खरेदीसाठी नावनोंदणी करण्याला सुरवात झाली आहे. जिल्ह्यात ९ केंद्रांवर ही खरेदी होणार आहे. यावर्षी मक्याला क्विंटलला हमीभाव १ हजार ८७० रुपये मिळेल. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

येवला : हमीभावाने मका,ज्वारी, बाजरी खरेदीसाठी नावनोंदणी करण्याला सुरवात झाली आहे. जिल्ह्यात ९ केंद्रांवर ही खरेदी होणार आहे. यावर्षी मक्याला क्विंटलला हमीभाव १ हजार ८७० रुपये मिळेल. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. देवळा, सिन्नर, नामपूर येथे नाव नोंदणी सुरू झाली आहे. इतर केंद्रांवर देखील नोंदणीला प्रारंभ होईल. 

मागील वर्षी जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली होती. तर, अवघ्या साडेतीन हजार शेतकऱ्यांची मका खरेदी होऊ शकली होती. 
जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी नाव नोंदणीबाबतचे आवाहन केले आहे. अद्याप मका शेतातच असून काढणी झालेली नाही. तर पुढेच नाव नोंदणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना यावर्षी दिलासा मिळाला आहे. त्यातही खासगी बाजारात भाव टिकून असल्याने हमीभावाच्या खरेदीला कितपत प्रतिसाद मिळणार, हे मक्याची काढणी झाल्यानंतरच समजेल. ७० टक्के शेतकरी खरेदीपासून वंचित राहत असल्याने ज्यांनी-ज्यांनी नावनोंदणी केली, त्या सर्वांची मका खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी 
करत आहेत.

..येथे होईल खरेदी

  •   तालुका सह. खरेदी विक्री संघ,सिन्नर
  •   तालुका सह. खरेदी विक्री संघ,येवला
  •   तालुका सह. खरेदी विक्री संघ,चांदवड
  •   शेतकरी सहकारी संघ,मालेगाव
  •   दक्षिण भाग सह. संस्था,सटाणा
  •   वि.का.सहकारी सोसायटी,नामपूर
  •   सहकारी खरेदी विक्री संघ,देवळा
  •   विभाग सहकारी खरेदी विक्री संघ, लासलगाव
  •   शनेश्वर सहकारी संघ,नांदगाव

असा मिळेल हमीभाव (प्रति क्वि.)

मका १८७०
ज्वारी मालदांडी २७३८
ज्वारी हायब्रीड २७५८
बाजरी २२५०
रागी ३३७७

 


इतर बातम्या
शिरपूर तालुक्यात आठ बंधाऱ्यांच्या...शिरपूर, जि. धुळे : तालुक्यातील बोरगाव, जातोडा आणि...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...
पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव...अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट...
देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन गरजेचेपुणे : देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट...
पहिली उचल ३३०० द्यावी ः राजू शेट्टी...कोल्हापूर : यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३३००...
कृषी पदव्युत्तर प्रवेशासाठी १३...पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर...
अकोला : दोन दिवसांतील अतिवृष्टीने  ४०...अकोला : जिल्ह्यात १६ व १७ ऑक्टोबरला झालेल्या...
यवतमाळ : सोयाबीन-कपाशी झाले मातीमोल यवतमाळ : जिल्ह्याभरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस...
आठ कारखान्यांना  सांगलीतील गाळप परवाना  सांगली : जिल्ह्यात गतवर्षी १५ साखर कारखान्यांना...
कोजागरीनिमित्त  दुधाचे दर वाढले पुणे : कोजागिरी पौर्णिमेसाठी गणेश पेठेतील घाऊक...
जागतिक स्पर्धेत टिकणारे द्राक्ष वाण...पिंपळगाव बसवंत, ता. निफाड : नाशिकचे द्राक्ष...
गावांचा विद्युतपुरवठा  खंडित करणार नाही कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या...
पूरबाधित ऊसप्रश्‍नी  उद्या कोल्हापुरात...कोल्हापूर : पूरबाधित उसाची प्राधान्याने तोड...
निळ्या भातांनी बहरली  आंबेगावमधील...फुलवडे, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम...
जळगाव जिल्हा बँकेच्या  निवडणुकीसाठी २७९...जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक...
एकरकमी ‘एफआरपी’साठी आता आंदोलन सातारा : कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील काही...
वरणगाव परिसरात पिकांवर पावसाचे पाणीवरणगाव, जि. जळगाव : यंदाच्या पावसाने...