हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदी

रंगाबाद जिल्ह्यातील ९ खरेदी केंद्रांवरून आतापर्यंत १ हजार ३४ क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव यांनी दिली.
maize.jpg
maize.jpg

औरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील ९ खरेदी केंद्रांवरून आतापर्यंत १ हजार ३४ क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव यांनी दिली.

किमान आधारभूत किमतीने मका खरेदीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात ९ केंद्रे सुरू करण्यात आली. या सर्व केंद्रांवर येत्या ३० जूनपर्यंत १८५० रुपये प्रति क्विंटल या दराने मक्याची खरेदी केली जाणार  आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९ केंद्रांवरून दोन हजार ४९५ शेतकऱ्यांनी मका आधारभूत किमतीने खरेदी केली जावी म्हणून ऑनलाइन नोंदणी केली. त्यामध्ये फुलंब्री केंद्रावर ३४७, गंगापूर ५८५ ,कन्नड ३५९, करमाड ३०६, खुलताबाद ४२९, लासूर ५९ , सोयगाव २१२, वैजापूर केंद्रावरून १९८ नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होता. सिल्लोड येथील केंद्रावर नोंदणीला प्रतिसाद मिळाला नाही. 

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी कन्नड केंद्रावरील ४६, करमाड केंद्रावरील १२०, व खुलताबाद केंद्रावरील ४० मिळून २०६ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी कन्नड व करमाड  या दोन केंद्रांवरील ४० शेतकरी प्रत्यक्ष आपली मका खरेदी केंद्रावर घेऊन आले. त्यांच्याकडील १०३४ क्विंटल मका किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली. खरेदी करण्यात आलेल्या मक्यामध्ये कन्नडच्या केंद्रावरील ५ शेतकऱ्यांकडील ८२ क्विंटल व करमाडच्या केंद्रावरील ३५ शेतकऱ्यांकडील ९५२ क्विंटल मक्याचा समावेश असल्याचे जिल्हा पणन अधिकारी पांडव म्हणाल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com