Agriculture news in Marathi Guaranteed purchase of one thousand quintals of maize | Page 2 ||| Agrowon

हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

रंगाबाद जिल्ह्यातील ९ खरेदी केंद्रांवरून आतापर्यंत १ हजार ३४ क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव यांनी दिली.

औरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील ९ खरेदी केंद्रांवरून आतापर्यंत १ हजार ३४ क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव यांनी दिली.

किमान आधारभूत किमतीने मका खरेदीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात ९ केंद्रे सुरू करण्यात आली. या सर्व केंद्रांवर येत्या ३० जूनपर्यंत १८५० रुपये प्रति क्विंटल या दराने मक्याची खरेदी केली जाणार 
आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९ केंद्रांवरून दोन हजार ४९५ शेतकऱ्यांनी मका आधारभूत किमतीने खरेदी केली जावी म्हणून ऑनलाइन नोंदणी केली. त्यामध्ये फुलंब्री केंद्रावर ३४७, गंगापूर ५८५ ,कन्नड ३५९, करमाड ३०६, खुलताबाद ४२९, लासूर ५९ , सोयगाव २१२, वैजापूर केंद्रावरून १९८ नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होता. सिल्लोड येथील केंद्रावर नोंदणीला प्रतिसाद मिळाला नाही. 

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी कन्नड केंद्रावरील ४६, करमाड केंद्रावरील १२०, व खुलताबाद केंद्रावरील ४० मिळून २०६ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी कन्नड व करमाड  या दोन केंद्रांवरील ४० शेतकरी प्रत्यक्ष आपली मका खरेदी केंद्रावर घेऊन आले. त्यांच्याकडील १०३४ क्विंटल मका किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली. खरेदी करण्यात आलेल्या मक्यामध्ये कन्नडच्या केंद्रावरील ५ शेतकऱ्यांकडील ८२ क्विंटल व करमाडच्या केंद्रावरील ३५ शेतकऱ्यांकडील ९५२ क्विंटल मक्याचा समावेश असल्याचे जिल्हा पणन अधिकारी पांडव म्हणाल्या.


इतर ताज्या घडामोडी
राज्यात सरासरीच्या २४ टक्के अधिक पाऊसपुणे ः जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसदृश्य...
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार...सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,...
अकोला झेडपीची सभा ऑनलाइन, तरीही नाश्‍...अकोला ः कोरोनामुळे बहुतांश सभा, बैठका ऑनलाइन होत...
खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे...मंचर, जि. पुणे : पशुसंवर्धन विभागातील खासगी...
सांगलीत अतिवृष्टीचा १८१ गावांना फटकासांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली...
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत...कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे,...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ...नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात...
ठाकरे, फडणवीस समोरासमोरकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी...
शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच...शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात...
पंढरपूरला जिल्हा करावासोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत...
जल, मृद्‍संधारण कामांवर भर द्यावा ः एस...बुलडाणा : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच...
खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा...नागपूर ः वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...