जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत हमीभावाने खरेदी

जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व गव्हाची खरेदी होणार आहे. मका खरेदीसंबंधीची मर्यादा किंवा लक्ष्यांक ६० हजार क्विंटल एवढा आहे. ज्वारीची २५ हजार ५०० क्विंटल आणि गव्हाची २२४० क्विंटल खरेदी विविध केंद्रांवर करायची आहे.
Guaranteed purchase of sorghum in 17 centers in Jalgaon district
Guaranteed purchase of sorghum in 17 centers in Jalgaon district

जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व गव्हाची खरेदी होणार आहे. मका खरेदीसंबंधीची मर्यादा किंवा लक्ष्यांक ६० हजार क्विंटल एवढा आहे. ज्वारीची २५ हजार ५०० क्विंटल आणि गव्हाची २२४० क्विंटल खरेदी विविध केंद्रांवर करायची आहे. मका खरेदी पुढील आठवड्यात सुरू होईल. तर ज्वारीची खरेदी सुरू झाली आहे. 

ज्वारी विक्रीसाठी १०६७९ शेतकऱ्यांनी, मका विक्रीसाठी ६५७४ आणि गहू विक्रीसाठी ७६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. पारोळा येथील केंद्रात ज्वारी विक्रीसाठी २१७१ आणि मका विक्रीसाठी ८५४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. ज्वारी विक्रीसाठी सर्वात कमी नोंदणी जळगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघात झाली. या केंद्रात फक्त ७६ शेतकऱ्यांनी ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली आहे.

मका विक्रीसाठी नोंदणीला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. तरीदेखील मका खरेदीचा लक्ष्यांक, तारीख जाहीर झालेली नव्हती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली होती. त्यामुळे प्रशासनाने मका खरेदीची तयारी केली आहे. यंदा खरेदी उशिरा सुरू झाली आहे. मका खरेदी लवकर सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. यामुळे किती शेतकरी ज्वारी विक्रीसंबंधीचा प्रतिसाद देतात, याबाबत प्रश्न आहे. पण मक्याच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळणार आहे. कारण बाजारात मक्याचे दर प्रतिक्विंटल सरासरी १४५० रुपये आहेत.

मक्याचा हमीभाव १८५० रुपये प्रतिक्विंटल आहे. चाळीसगाव येथील केंद्रात ज्वारी विक्रीसाठी फक्त एकाच शेतकऱ्याने नोंदणी केली. भुसावळ, कोरपावली (ता. यावल), रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर आणि अमळनेर येथे एकाही शेतकऱ्याने ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली नसल्याची माहिती आहे. मका, ज्वारीची खरेदी करताना कोवि़ड नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. खरेदीसाठी एका दिवशी १० शेतकऱ्यांना एका केंद्रात बोलावले जाणार आहे. 

मका खरेदीला उशीर का?

मका खरेदीसंबंधीच्या केंद्रनिहाय लक्ष्यांकाचे पत्र २४ मे रोजी मार्केटिंग फेडरेशनने जारी केले आहे. पण खरेदी ११ जूनचा दिवस संपला तरी जळगाव इतर भागांत सुरू झाली नाही. मका खरेदीसंबंधीचे पत्र मार्केटिंग फेडरेशनने १० जून रोजी विविध संस्थांना जारी केले आहे. खरेदीचे पत्र जारी करण्यास १५ दिवस उशीर का केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com