नांदेड : हमीभावाने साडेएकोणतीस हजार क्विंटल तूर खरेदी

Guaranteed purchase of Twenty nine thousand quintals tur
Guaranteed purchase of Twenty nine thousand quintals tur

नांदेड ः किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये २३ खरेदी केंद्रांवर शनिवार(ता. ७)पर्यंत एकूण ४ हजार ४७ शेतकऱ्यांची २९ हजार ५७०.५७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी या वर्षी (२०१९-२०) नाफेडतर्फे राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ यांच्यामार्फत तूर विक्रीसाठी ४३ हजार ६०२ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली.

नांदेड जिल्ह्यात जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाअंतर्गत नांदेड, हदगाव, किनवट, मुखेड येथील केंद्रांवर आणि विदर्भ सहकारी महासंघाच्या भोकर, धर्माबाद, नायगाव येथील केंद्रांवर मिळून एकूण ११ हजार १७८ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाअंतर्गत ७४८ शेतकऱ्यांची ३ हजार ३८६.९० क्विंटल खरेदी करण्यात आली, असे जिल्हा व्यवस्थापक सुधील पाटील यांनी सांगितले. विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे ४९२ शेतकऱ्यांची २ हजार ६४२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. 

राज्य सहकारी पणन महासंघअंतर्गत जिल्हा पणन अधिकारी कार्यालयातर्फे परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा या सात केंद्रांवर मिळून एकूण १६ हजार २८६ शेतकऱ्यांनी आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वसमत, जवळाबाजार, सेनगाव, साखरा येथील केंद्रांवर मिळून एकूण १२ हजार ३६८ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. पणन अधिकारी कार्यालयाअंतर्गत परभणी ६६७ शेतकऱ्यांची ६ हजार २५.२७ क्विंटल आणि हिंगोली जिल्ह्यात १ हजार २५६ शेतकऱ्यांची १० हजार ६४१.९० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली, असे जिल्हा व्यवस्थापक मिलिंद कापुरे यांनी सांगितले. 

विदर्भ सहकारी महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील मानवत आणि गंगाखेड येथील केंद्रावर ३ जार ७७० शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी केली आहे. मानवत आणि गंगाखेड येखील केंद्रावर मिळून एकूण ८८४ शेतकऱ्यांची ६ हजार ८७४.५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली, असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले.

हरभरा नोंदणीसाठी अडचणी हमीभावाने हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. परंतु अनेक तालुक्यांत अद्याप हरभऱ्याचा अद्ययावत पीक पेरा असलेला आॅनलाइन ७-१२ उतारा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. शनिवार(ता.७)पर्यंत नांदेड जिल्ह्यातील नांदेड आणि देगलूर येथे २२७ शेतकऱ्यांची आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगाव येथे ६२ शेतकऱ्यांनी असे एकूण २८९ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com