agriculture news in marathi, guardian minister gives order to submit the objective information of the scarcity situation, parbhani, maharashtra | Agrowon

टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर करा : पालकमंत्री अतुल सावे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना योग्य मदत करण्यासाठी टंचाईग्रस्त गावांतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीक परिस्थिती, पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता, आवश्यकता, पशुधनाची संख्या आदीची वस्तुनिष्ठ माहिती तयार करावी, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.

हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना योग्य मदत करण्यासाठी टंचाईग्रस्त गावांतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीक परिस्थिती, पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता, आवश्यकता, पशुधनाची संख्या आदीची वस्तुनिष्ठ माहिती तयार करावी, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. १५) आढावा बैठक झाली. या वेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सावे म्हणाले, ‘‘पावसाळा सुरू होऊन सुमारे दीड महिन्याहून अधिक कालावधी झाला. परंतु, जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात ५० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गरजू गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. शेतकरी टंचाईला सामोरे जात आहेत. त्यांना पिकांच्या सिंचनासाठी विजेची आवश्यकता आहे. परंतु ट्रॉन्सफॉर्मर, ऑईल नसल्याचे कारण सांगून महावितरणतर्फे वीजपुरवठा केला जात नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शेतीपंपांना प्राधान्याने वीजपुरवठा करावा.’’

‘‘जिल्ह्यात ८३ दिवस पुरेल इतका चारा शिल्लक आहे. बियाणे आणि खतेदेखील मुबलक प्रमाणात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली का नाही, याची माहिती मिळत नसल्याने ते संभ्रमात आहेत. त्यामुळे बँकांनी कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची माहिती बँकेच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करावी. जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष मंजूर झाला असून, त्यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली,’’ असे सावे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापुरात नुसताच सोसाट्याचा वारा सोलापूर  ः निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई,...
कर्जमाफीच्या लाभार्थ्यांना तत्काळ पीक...परभणी : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नाशिक जिल्ह्यातील ६५० विद्युत खांब...नाशिक : जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह...
जालन्यात कृषी विभागाच्या बांधावर खत...जालना : एकाच दिवशी शेतकऱ्यांना थेट बांधावर खत...
‘निसर्ग’च्या नुकसानग्रस्तांना...नाशिक : निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यासह जिल्ह्याला...
अकलूजच्या शिवामृतकडून गाईच्या दूधाला २५...अकलूज, जि. सोलापूर : अकलूज येथील शिवामृत दूध...
सोलापूर जिल्ह्यात १३ टँकरद्वारे...सोलापूर : जिल्ह्यात आतापर्यंत ४० गावांमध्ये १३...
पीककर्ज द्या, वीजबिल माफ करा,...सोलापूर  ः शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया...
जालन्यात सव्वा लाख क्विंटलवर कापूस...जालना : जिल्ह्यात कापूस खरेदीची एकूण ८...
औरंगाबाद जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व कपाशी...औरंगाबाद : जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात...
पुणे बाजार समितीत शेतीमालाची आवक तुरळकचपुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु...
निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः निसर्ग चक्रीवादळ आणि अति पावसाचा...
नुकसानग्रस्तांना मदतीबाबत योग्य तो...पुणे  ः निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे...
मंजुर येथील बंधाऱ्याचा भराव पहिल्याच...नगर  ः मंजुर (ता.कोपरगाव) येथील कोल्हापुर...
जत तालुक्‍याच्या पूर्व भागात चारा टंचाईसांगली  ः पावसाने दिलेली दडी, वाया गेलेला...
भुईबावडा परिसरातील तीन गावांना ...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील भुईबावडा (ता.वैभववाडी)...
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी...रत्नागिरी  : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले...
अकोल्यात कंटेनमेंट झोन वाढणार नाहीत...अकोला  ः अकोल्यात कोरोना बाधितांची वाढत...
कर्नाटकी बेंदुरावर कोरोनाचे सावटकोल्हापूर:  कर्नाटकी बेंदूर उद्या (ता.७)...
अटींवरच शेतकऱ्यांना वर्ध्यात कापूस...वर्धा  ः वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या...