परभणी जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी केली पीक परिस्थितीची पाहणी

पालकमंत्र्यांनी केली पीक परिस्थितीची पाहणी
पालकमंत्र्यांनी केली पीक परिस्थितीची पाहणी

परभणी ः दुष्काळी परिस्थितीत शेतरस्ते, शेततळे, विहिरी पुनर्भरण आदी कामे प्राधान्याने करावीत. शेतकऱ्यांना शासनाने दिलेले नुकसान भरपाई अनुदान, विमा परतावा आदी रकमा कर्ज खात्यात जमा करू नये, असे निर्देश पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी (ता. २४) कमी पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळाचा परभणी जिल्ह्यातील दूधगाव (ता. सोनपेठ) बाभळगांव, लिंबा (ता. पाथरी), ताडबोरगांव (ता. मानवत), किन्होळा (ता. परभणी) शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या समस्या, भावना जाणून घेतल्या. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार मोहन फड, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपजिल्हाधिकारी व्ही. एन. कोळी, तहसीलदार श्रीमती बाफना, जीवराज डापकर, बायस, गणेश कोरेवाड आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com