पालकमंत्री कांबळे यांनी केली पीक परिस्थितीची पाहणी

पालकमंत्री कांबळे यांनी केली पीक परिस्थितीची पाहणी
पालकमंत्री कांबळे यांनी केली पीक परिस्थितीची पाहणी

हिंगोली ः हिंगोली आणि कळमनुरी तालुक्यांतील परिसरातील पावसाअभावी वाढ न झालेल्या तूर आणि कापूस तसेच अन्य खरीप पिकांची पाहणी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी शुक्रवारी (ता. १९) केली.

हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी, राहूरी खुर्द, केसापूर, काळकोंडी, कळमनुरी तालुक्यांतील जांभरुन, रेणापूर, सालेगाव, वाकोडी, मोरवाडी या गावांतील टंचाई सदृश स्थितीची पाहणी केली.

या वेळी खासदार राजीव सातव, आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, डॉ. संतोष टारफे, रामराव वडकुते, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासह विविध आशयांचे निवेदन या वेळी दिलीप कांबळे यांना देण्यात आले. या वेळी पालकमंत्री कांबळे यांनी शेतकरी बांधवांची भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी करत टंचाई सदृश परिस्थितीची माहिती घेतली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com