परभणीत पेरू १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल

परभणीत पेरू १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल
परभणीत पेरू १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ६) पेरूची ४० क्विंटल आवक झाली. पेरूला प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २५०० ते ४०००० रुपये दर मिळाले. काकडीची ४५  क्विंटल आवक होऊन ५०० ते १००० रुपये दर मिळाले.

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ४० हजार जुड्यांची आवक झाली. त्यांना प्रतिशेकडा २५० ते ४०० रुपये दर मिळाले. पालकाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले.

चुक्याची ४६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ८० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ७०० क्रेट आवक असताना प्रतिक्रेटला २०० ते ४०० रुपये रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यामध्ये वाटण्याची १२५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. गवारीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. चवळीची ४ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. वालाची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ३००० रुपये दर मिळाले.

पातीच्या कांद्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. वांग्यांची ४० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले.

कोबीची ३५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला १२०० ते १५०० रुपये मिळाले. भेंडीची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. गाजराची १० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. लिंबांची २५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ४०० ते १००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com