agriculture news in marathi, Guidance on crop insurance Scheme | Agrowon

पीकविमा योजनेबाबत मार्गदर्शन करा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 जुलै 2018

नगर ः जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना पीकविमा योजना व पंतप्रधान विमा योजनेचा लाभ मिळावा व या योजनेत त्यांना सहभागी करून घेण्यासाठी कृषी विभागाने येत्या वीस दिवसांत प्रत्येक गावापर्यंत संपर्क साधून विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांना मागदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. जिल्ह्यामध्ये पीकविमा उतरवण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रमाणिकपणे काम केले तर हे प्रमाण वाढेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नगर ः जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना पीकविमा योजना व पंतप्रधान विमा योजनेचा लाभ मिळावा व या योजनेत त्यांना सहभागी करून घेण्यासाठी कृषी विभागाने येत्या वीस दिवसांत प्रत्येक गावापर्यंत संपर्क साधून विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांना मागदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. जिल्ह्यामध्ये पीकविमा उतरवण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रमाणिकपणे काम केले तर हे प्रमाण वाढेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवारी (ता. ४) कृषी विभागातर्फे ‘पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण वर्ग खरीप हंगाम २०१८-१९’ या कार्यशाळा झाली. निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, पुणे येथील तंत्र अधिकारी कांतीलाल पवार, अरुण कांबळे, दीपक पाटील, नरेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, गौरव शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रांताधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी उपस्थित होते.

द्विवेदी म्हणाले, ‘नगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. मागील वर्षीचा विचार केला, तर खूप कमी शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न आहे. जिल्ह्यात ९ लाख शेतकरी असून त्यापैकी ११ हजार शेतकरी ऑनलाइन नाव नोंदणी करतात हे प्रमाण खूप कमी आहे. आपल्याकडे वीस दिवस आहेत. या वीस दिवसांत गावागावात जाऊन चौक सभा, प्रशिक्षणाचे आयोजन करा. प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम केले, तर लक्ष्यांक गाठाल. सुरवातीपासूनच मोहीम चालू ठेवा. तंत्र अधिकारी कांतीलाल पवार, प्रशांत पाटील, अरुण कांबळे यांनी पीक कापणी प्रयोगाविषयी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

आयुक्तानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी झापले
नगर जिल्ह्यामधील कृषी विभागाच्या कामाची फारशी प्रगती नाही, असे स्पष्ट करत जिल्हाभरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आठ दिवसांपूर्वी अचानक नगरला आढावा बैठक घेऊन राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी चांगले झापले. कृषी विभागाने तयार केलेली माहिती एकूण घेतली तर नाहीच, उलट ‘कामात कसूर केला तर थेट कारवाई’ असा इशारा त्यांनी भर बैठकीत दिला. त्यानंतर बुधवारी झालेल्या पीक कापणी प्रयोग कार्यशाळेत जिल्हाधिकाऱ्यांनीही झापल्याने कृषी विभागावर आठवड्यात दोनदा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाराजी सहन करण्याची नामुष्की आली. जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाच्या कामाबाबत कडक भूमिका घेतली आहे. सिना नदीतील अतिक्रमण काढण्यासह अन्य बाबींमुळे द्विवेदी जिल्हाभर लोकप्रिय झाले आहेत.

 


इतर ताज्या घडामोडी
विक्री केंद्रांद्वारे सेंद्रिय भाजीपाला...हिंगोली : ‘‘मानवी आरोग्य अबाधित राखण्यासाठी...
हिंगोलीत व्यापारी, खासगी बॅंकांकडून १५...हिंगोली : जिल्ह्यातील विविध बॅंकांनी रविवार (ता....
पैठण तालुक्यात मोकाट जनावरांकडून...औरंगाबाद : शेकडोंच्या संख्येने कळपाने येऊन...
सोलापूर जिल्ह्यात सव्वा लाख...सोलापूर  : मीटर रिडींग सुरु झाल्यामुळे...
सोलापूर जिल्हा भूमि अभिलेखने मिळवला ३०...सोलापूर  : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख व...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसआरआय`ने होणार...सिंधुदुर्ग : राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि...
दुधात नफा नव्हे; उत्पादन खर्चातच पाच...नगर ः दूध व्यवसाय टिकण्याचा कितीही प्रयत्न केला...
पुणे जिल्ह्यात युरिया टंचाईपुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू असल्याने...
अकोल्यात सोयाबीन बियाणेप्रकरणी २९५७...अकोला ः जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची उगवण न...
जत पूर्व भागात पेरलं; पण उगवलंच नाहीउमदी, जि. सांगली : एकीकडे कोरोनाचे थैमान; तर...
वैरागमध्ये निकृष्ट सोयाबीन बियाणे...सोलापूर  : सोयाबीनचे निकृष्ट दर्जाचे बियाणे...
जळगावात लॉकडाउनमुळे खते गेली परतजळगाव ः जिल्ह्यात खतांची टंचाई आहे. यातच जळगाव,...
यवतमाळ जिल्ह्यात पेरणीनंतर मिळणार बियाणेयवतमाळ : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे...
जळगावच्या पूर्व भागात पावसाचा लहरीपणाजळगाव ः जिल्ह्यात सरासरीच्या २६ टक्क्यांवर पाऊस...
केंद्र सरकारने शेतकरीविरोधी अध्यादेश...नाशिक : केंद्र सरकारने अलीकडेच शेतीसंबंधी तीन...
पीकविमा योजनेच्या निकषांत बदल गरजेचा ः...नांदेड : इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये नांदेड...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम;...रत्नागिरी  ः जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे...
चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर सांगली  : जिल्ह्यात बुधवार (ता. ८)...
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातच २९...परभणी : सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळे...
दापोली, मंडणगडमधील ५८५० हेक्टर क्षेत्र...रत्नागिरी  ः निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली...