मालेगाव ‘केव्हिके’कडून शेतकऱ्यांना बोंड अळीवर मार्गदर्शन

नाशिक :तालुक्यातील मोरझर येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंड अळी व्यवस्थापनावर मार्गदर्शन करण्यात आले.
Guidance to farmers on Bond Ali from Malegaon ‘KVK’
Guidance to farmers on Bond Ali from Malegaon ‘KVK’

नाशिक : ‘‘नांदगाव तालुक्यात ८२७० हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकाची लागवड करण्यात आली. शास्त्रज्ञांचे व कृषी विभागाच्या सूचनेनूसार ऑक्टोबर-नोव्हेंबर या दरम्यान बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासाठी तालुक्यातील मोरझर येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंड अळी व्यवस्थापनावर मार्गदर्शन करण्यात आले. 

नांदगाव तालुक्यात२ ते १० नोव्हेंबर बोंडअळी व्यवस्थापन कार्यक्रम, गावोगावी प्रचार फेरी, शिवार बैठका घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्र वडेल (ता.मालेगाव) येथील पीक संरक्षण विषय विशेषज्ञ विशाल चौधरी यांनी नांदगाव मंडळातील मोरझर, तांदुळवाडीत मार्गदर्शन केले. 

तालुक्यात एप्रिल- मे महिन्यात बोंड अळी व लष्करी अळी निर्मूलनाबाबत मोहीम हाती घेण्यात आली होती. बोंड अळी निर्मूलनासाठी जनजागृती करणे, प्रथम निंबोळी अर्क फवारणी करणे, पक्षी थांबे उभारणे, कामगंध सापळे लावणे आदी  उपाययोजना करण्यात आल्या. त्याचा फायदा होऊन सुरवातीला बोंड आळीपासून कपाशी पीक वाचविण्यात आले, असे चौधरी यांनी सांगितले. 

  •     फरदड घेऊ नये
  •     कपाशीचे अवशेष नष्ट करा
  •     प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रांत शिफारशीनुसार      फवारणी करा 
  •     एकरी ५ या प्रमाणात कामगंध              सापळे    लावा 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com