हरभरा लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन

हरभरा लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन
हरभरा लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन

औरंगाबाद : कृषी विज्ञान मंडळाच्या कार्यक्रमांतर्गत एमजीएम कृषी विज्ञान केंद्र गांधेली औरंगाबाद येथे रविवारी (ता. २१) हरभरा लागवड तंत्रज्ञानबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला. या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषिभूषण सुदाम साळुंके होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतिशील शेतकरी भिंदोनचे दादासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी एमजीएम हिल्सचे डॉ. उन्मेश कदम हे होते. तर डॉ. पी. ए. पगार, कडधान्य संशोधन केंद्र, बदनापुर मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात गांधीजीच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. कार्यक्रमात डॉ. पी. ए. पगार यांनी हरभऱ्याच्या कमी उत्पादनाची कारणे, जमीन निवडताना घ्यावयाची काळजी, रोगास प्रतिबंधक वाणाची निवड, बीजप्रक्रिया, खतव्यवस्थापन, आंतरमशागत, कीड व रोग व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोप करताना सुदाम साळुंके म्हणाले, सध्या दुष्काळाचे वर्ष वाटत आहे. त्यामुळे कमी पाण्यावर येणारी हरभऱ्यासारखी पिके शेतकऱ्यांनी निवडावी. नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेतीमध्ये वापर करावा, या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी एमजीएम कृषी विज्ञान केंद्र, गांधेली हिल्स येथे सुरू असलेल्या विविध उपक्रमास भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमजीएम कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एन. एम. मस्के यांनी केले. प्रा. के. ए. सुकासे यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमास पिंपळगाव, परदारी, भिंदोन व शिंदोन येथील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमजीएम कृषी विज्ञान केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com