कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक वस्तूंना लॉकडाऊन नाही : केंद्र सरकार

अत्यावश्‍यक वस्तूंची पुरवठा साखळी सुरळीत व्हावी यासाठी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना पत्र लिहून याबाबत निर्देश दिले आहेत.
कृषी उत्पादनांसह अत्यावश्‍यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी केंद्राचे निर्देश 
कृषी उत्पादनांसह अत्यावश्‍यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी केंद्राचे निर्देश 

नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे राज्य सरकारांना स्थानिक पातळीवर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक वस्तूंची पुरवठा साखळी सुरळीत व्हावी यासाठी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना पत्र लिहून याबाबत निर्देश दिले आहेत.  ‘‘अन्नधान्य, ग्रॉसरिज्, फळे आणि भाजीपाला, डेअरी आणि दुग्धोत्पादने, मांस आणि मासे, पशुधन खाद्य, बियाणे, खते आणि कीडनाशके, शेती उत्पादने, ड्रग्स, औषधे, मेडिकल डिव्हायसेस या अत्यावश्‍यक वस्तुंचे उत्पादन, वेअरहाऊस आणि वाहतुकीला लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. तसेच अत्यावश्‍यक वस्तुंचे उत्पादन करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि त्याची वाहतूक करण्यासाठी मध्यस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट करण्यात आली आहेत,’’ असे अजय भल्ला यांनी पत्रात म्हटले आहे.  ‘‘केंद्र सरकारने लॉकडाऊनमधून सूट देण्यात आलेल्या वस्तूंबाबत स्थानिक पातळीवर मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. त्यामुळे या अत्यावश्‍यक वस्तूंच्या पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत आहेत. म्हणून स्थानिक पातळीवर याबाबत स्पष्टता येणे आवश्‍यक आहे,’’ असे श्री. भल्ला यांनी म्हटले आहे.  ‘‘अत्यावश्‍यक वस्तूंचे उत्पादन आणि वेअरहाऊस आणि वाहतुकीला लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. सूट असणाऱ्या व्यवसायांसाठी जिल्हा प्रशासन वैयक्तिक परवाने देत आहेत. हे परवाने घेण्यासाठी अनेक भागात अडचणी येत आहेत. त्यामुळे ज्या अत्यावश्‍यक वस्तूंची पुरवठा साखळी देशभरात आहे या व्यवसायांना प्रशासनाने परवाने द्यावे. अशा व्यवसायातील कर्मचारी आणि कामगारांना या वस्तूंचा प्रादेशिक पुरवठा करण्यासाठी पासेस द्याव्यात. या वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या लोकांना रेल्वे, बंदरे आणि विमानतळांवर पासेस द्याव्यात,’’ अशा सूचना गृहमंत्रालयाने केल्या आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com