सोलापूर जिल्हा परिषदेचे उपक्रम राज्याला मार्गदर्शक : जोशी

सोलापूर जिल्हा परिषदेचे उपक्रम राज्याला मार्गदर्शक : जोशी
सोलापूर जिल्हा परिषदेचे उपक्रम राज्याला मार्गदर्शक : जोशी

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम राज्याला मार्गदर्शक आहेत, असे मत प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मुंबईचे अध्यक्ष अंबादास जोशी यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषदेने प्रशासन गतिमान करण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाची पाहणी केल्यानंतर यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी डॉ. भारुड यांनी जोशी यांचे स्वागत केले. त्यांनी बेस्ट बीडीओ संकल्पना, अभिलेख वर्गीकरण, झिरो पेन्डसी, दप्तर वर्गीकरण, आरोग्य दूत उपक्रम, जिल्ह्यात राबविलेल्या जादुई शोषखड्ड्यांचे अभियान, याबरोबरच अभिलेख वर्गीकरणाच्या अभिलेख गृहाची पाहणी केली.

जोशी म्हणाले, ''जिल्हा परिषदेच्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. यामध्ये कमी कालावधीत पूर्ण केलेली १० हजार घरकुले, चार महिन्यांत लोकसहभाग व प्रशासकीय योजनेतून पूर्ण केलेले सांडपाण्याचे शोषखड्डे आदींचा समावेश आहे. डॉ. भारूड यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे.''

उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत यांनी प्रास्ताविक केले. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश आवताडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड उपस्थित होते. कर्मवीर मामासाहेब जगदाळे सामाजिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जोशी यांच्या हस्ते डॉ. भारुड यांचा सत्कार केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com