agriculture news in Marathi guinness world record of Bhavarlal jain mojac portrait Maharashtra | Agrowon

जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची ‘गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने त्यांच्या पोर्ट्रेटची निर्मिती कलावंतांनी केली, या कलाकृतीची नोंद ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली.

जळगाव :  जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने त्यांच्या पोर्ट्रेटची निर्मिती कलावंतांनी केली, या कलाकृतीची नोंद ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली. या पोर्ट्रेटचे लोकार्पण जैन व्हॅली परिसरातील भाऊंची सृष्टी येथे करण्यात आले. 

कलाकृती लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सेवादास दलीचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, जैन परिवारातील सर्व सदस्य, ज्यांच्या कल्पकतेतून ही कलाकृती साकारली ते प्रदीप भोसले व त्यांचे कुटुंबीय तसेच वास्तुविशारद गिमी फरहाद, डॉ. सुभाष चौधरी उपस्थित होते. आर्किटेक शिरीष बर्वे, प्राचार्य शिल्पा बेंडाळे, चित्रकार सचिन मुसळे, विविध वस्तूंचा वापर करून मोझेक आर्टमध्ये जागतिक विक्रम करणारे मुंबई येथील आर्टिस्ट चेतन राऊत यांची उपस्थिती होती.

जैन पाइप्सचा उपयोग करून जैन व्हॅली परिसरातील भाऊंची सृष्टी येथे १५० फूट लांब व १२० फूट रुंद असे सुमारे १८ हजार चौरस फूट मोजेक प्रकारातील पोर्ट्रेट साकारले. पोर्ट्रेटसाठी पीई पाइप २५ टन म्हणजेच नऊ हजार नग तर पीव्हीसी पाइप पाच टन म्हणजेच एक हजार नग, असे एकूण दहा हजार पाइप वापरण्यात आले. १६ ते २२ फेब्रुवारीदरम्यान सात दिवस प्रत्येक दिवशी १४ तास अशा एकूण ९८ तासांत ही कलाकृती साकारली. 
या कलाकृतीसाठी लागलेल्या पाइपची संख्या सरळ जोडणी केल्यास २१.९ किलोमीटर लांबीपर्यंत होऊ शकते. या प्रकारात यापूर्वी ६९५ स्क्वेअर मीटरचा विक्रम होता, मात्र भवरलालजी जैन यांच्या या पोर्ट्रेटने नवा जागतिक विक्रम प्रस्थापित झाला.

प्रतिक्रिया
कंपनीचे सहकारी प्रदीप भोसले यांच्यासह सहकाऱ्यांनी श्रद्धेय भवरलाल जैन यांची कलाकृती अनुभूती स्कूलच्या क्रीडांगणावर साकारली होती. कायमस्वरूपी जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध व्हावी यादृष्टीने जैन व्हॅली परिसरातील भाऊंच्या सृष्टीत ही कलाकृती प्रस्थापित केली आहे. 
- अशोक जैन, अध्यक्ष, जैन उद्योग समूह


इतर ताज्या घडामोडी
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
कृषी विभागात कोरोनामुळे आत्तापर्यंत २८...पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गेल्या काही...
‘पंदेकृवि’ने दीक्षान्त सोहळा पुढे...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने...
कुर्जा खरेदी केंद्रावर धान मोजणीविना...भंडारा : पवनी तालुक्यातील कुर्जा येथे अनेक...
कापूस पिकासाठी यंत्रमानव ठरणार वरदान ः...अकोला ः देशांतर्गत कापूस लागवडीचे क्षेत्र १२९ लाख...
कृषी विभागातील पाच पुरस्कार्थींचे कौतुक पुणे : राज्याच्या कृषी खात्यात उल्लेखनीय कामे...
विमा उतरवा, अन्यथा बाजार समित्या बंद...पुणे/नाशिक ः शेतकरी, कामगार, राज्य सरकारचे सर्व...
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...