कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
बातम्या
जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची ‘गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद
जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने त्यांच्या पोर्ट्रेटची निर्मिती कलावंतांनी केली, या कलाकृतीची नोंद ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली.
जळगाव : जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने त्यांच्या पोर्ट्रेटची निर्मिती कलावंतांनी केली, या कलाकृतीची नोंद ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली. या पोर्ट्रेटचे लोकार्पण जैन व्हॅली परिसरातील भाऊंची सृष्टी येथे करण्यात आले.
कलाकृती लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सेवादास दलीचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, जैन परिवारातील सर्व सदस्य, ज्यांच्या कल्पकतेतून ही कलाकृती साकारली ते प्रदीप भोसले व त्यांचे कुटुंबीय तसेच वास्तुविशारद गिमी फरहाद, डॉ. सुभाष चौधरी उपस्थित होते. आर्किटेक शिरीष बर्वे, प्राचार्य शिल्पा बेंडाळे, चित्रकार सचिन मुसळे, विविध वस्तूंचा वापर करून मोझेक आर्टमध्ये जागतिक विक्रम करणारे मुंबई येथील आर्टिस्ट चेतन राऊत यांची उपस्थिती होती.
जैन पाइप्सचा उपयोग करून जैन व्हॅली परिसरातील भाऊंची सृष्टी येथे १५० फूट लांब व १२० फूट रुंद असे सुमारे १८ हजार चौरस फूट मोजेक प्रकारातील पोर्ट्रेट साकारले. पोर्ट्रेटसाठी पीई पाइप २५ टन म्हणजेच नऊ हजार नग तर पीव्हीसी पाइप पाच टन म्हणजेच एक हजार नग, असे एकूण दहा हजार पाइप वापरण्यात आले. १६ ते २२ फेब्रुवारीदरम्यान सात दिवस प्रत्येक दिवशी १४ तास अशा एकूण ९८ तासांत ही कलाकृती साकारली.
या कलाकृतीसाठी लागलेल्या पाइपची संख्या सरळ जोडणी केल्यास २१.९ किलोमीटर लांबीपर्यंत होऊ शकते. या प्रकारात यापूर्वी ६९५ स्क्वेअर मीटरचा विक्रम होता, मात्र भवरलालजी जैन यांच्या या पोर्ट्रेटने नवा जागतिक विक्रम प्रस्थापित झाला.
प्रतिक्रिया
कंपनीचे सहकारी प्रदीप भोसले यांच्यासह सहकाऱ्यांनी श्रद्धेय भवरलाल जैन यांची कलाकृती अनुभूती स्कूलच्या क्रीडांगणावर साकारली होती. कायमस्वरूपी जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध व्हावी यादृष्टीने जैन व्हॅली परिसरातील भाऊंच्या सृष्टीत ही कलाकृती प्रस्थापित केली आहे.
- अशोक जैन, अध्यक्ष, जैन उद्योग समूह
- 1 of 1590
- ››