नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
ताज्या घडामोडी
गुजरातमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नी आजपासून खेड्यांचा असहकार
अहमदाबाद : महाराष्ट्रानंतर आता गुजरातमध्येही शेतकरी आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किसान सभेचे नेते अशोक ढवळे हे गुजरातमध्ये डेरेदाखल झाले असून, आज (ता. १) पासून बहुतांश खेडी सरकारविरोधात असहकार आंदोलन पुकारणार आहेत. आजपासून खेड्यांतून शहरांना होणारा दूध, पालेभाज्या आणि कडधान्यांचा पुरवठा थांबविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

आज पत्रकारपरिषदेत बोलताना ढवळे म्हणाले की, ''केंद्राच्या बुलेट ट्रेनचा प्रकल्प आणि मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूसंपादन केले जात असताना शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळताना दिसत नाही. या प्रकल्पांमुळे गुजरातमधील शेतकऱ्यांना ३४ टक्के जमीन गमवावी लागेल. या दोन्ही प्रकल्पांचा निषेध करण्यासाठी ३ जून रोजी महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आंदोलन होणार असून, पाच जून रोजी गुजरातमधील शेतकरी एल्गार करतील.''
येत्या ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांतिदिनी अखिल भारतीय किसान महासभा केंद्र सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन पुकारणार आहे. या वेळी सरकारला "छोडो भारत'चा इशारा देण्यात येईल. शेतीमालास रास्त भाव देण्याबरोबरच सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी. पंतप्रधान पीक विमा योजना ही कार्पोरेटचे भले करण्यासाठीच सुरू करण्यात आली आहे.
- अशोक ढवळे, किसान सभेचे नेते