agriculture news in marathi Gujrat CM Vijay Rupani isolates himself | Agrowon

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी एकांतवासात

वृत्तसेवा
गुरुवार, 16 एप्रिल 2020

 गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी बुधवारी स्वतःहून एकांतवासात राहण्याचा निर्णय घेतला असून या कालावधीत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते राज्य कारभार करणार आहेत

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी बुधवारी स्वतःहून एकांतवासात राहण्याचा निर्णय घेतला असून या कालावधीत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील कारभारावर नजर ठेवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाचे (सीएमओ) सचिव अश्वनी कुमार यांनी बुधवारी दिली.

विजय रुपानी यांनी काँग्रेसचे राज्यातील आमदार इम्रान खेडावाला यांची मंगळवारी भेट घेतली होती. इम्रान खेडावाला यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विजय रुपानी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून एकांतवासात राहाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गुजरात सरकारने रुपानी यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांना काहीही झालेले नसल्याची माहिती दिली आहे.

विजय रुपानी यांचे स्वीय सचिव अश्वनी कुमार यांनी या विषयी माहिती देताना सांगितले, की विजय रुपानी यांची तब्येत एकदम ठणठणीत आहे. डॉ. अतुल पटेल आणि डॉ. आर के पटेल यांनी बुधवारी सकाळी रुपानी यांची तपासणी केली आहे. त्यांच्यामध्ये सध्या कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे नाहीत. पण केवळ खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या एक आठवड्यासाठी त्यांना भेटण्यासाठी घरामध्ये कोणालाही सोडण्यात येणार नाही. दरम्यान, काँग्रेस आमदार इम्रान खेडावाला यांना काही दिवसांपासून ताप होता. त्यामुळे कोरोनाच्या चाचणीसाठी त्यांचे नमुने देखील घेण्यात आले होते. मात्र, त्याचा अहवाल येण्याआधीच ते बाहेर फिरत होते.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...