ज्ञानगंगा प्रकल्प १०० टक्के; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

ज्ञानगंगा प्रकल्प १०० टक्के भरला; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
ज्ञानगंगा प्रकल्प १०० टक्के भरला; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

बुलडाणा  : ज्ञानगंगा नदीवर असलेला प्रकल्प मंगळवारी (ता. ३) १०० टक्के भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास सांडव्यावरून पाणी नदीत वाहू शकते. त्यामुळे प्रकल्पाखाली ज्ञानगंगा नदीला केव्हाही पूर येऊ शकतो, त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, मंगळवारी परिसरात पाऊस थांबलेला होता.  नदीकाठावर असलेल्या नागरिकांनी आपली जनावरे सुरक्षित स्थळी हलवावित. तसेच सतर्क राहून पूर आल्यास प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. खामगाव तालुक्यातील गेरू माटरगांव, श्रीधरनगर, गेरू, सारोळा, वर्णा  दिवठाणा, निमकवळा, पोरज, तांदुळवाडी, पिंपळगांव राजा, घाणेगांव, ज्ञानगंगापूर, दौडवाडा, नांदुरा तालुक्यातील वळती खुर्द, वळती बुद्रूक, वसाडी खुर्द, वसाडी बुद्रूक, धानोरा खु, धानोरा बु, वडगांव, खातखेड, वडाळी, रसुलपूर, खुदानपूर, भुईशिंगा, निमगांव, नारायणपूर, रामपूर, अवधा खुर्द, अवधा बुद्रूक, नारखेड, हिंगणा दादगांव, हिंगणा इसापूर, दादगांव आणि शेगाव तालुक्यातील डोलारखेड व वरध ही गावे या नदीच्या काठावर आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com