Agriculture news in Marathi Hail hits mango orchards | Agrowon

रत्नागिरी : गारपिटीचा आंबा बागांना फटका

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 मार्च 2021

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसासह गारपिटीमुळे जिल्ह्यातील आंबा, काजूसह रब्बीचे सुमारे १०० हेक्टरवरील नुकसान झाले आहे.

रत्नागिरी ः पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसासह गारपिटीमुळे जिल्ह्यातील आंबा, काजूसह रब्बीचे सुमारे १०० हेक्टरवरील नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा सर्व्हे सुरू केला आहे. सर्वाधिक नुकसान संगमेश्‍वर, चिपळूण तालुक्यात झाले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात १८ फेब्रुवारीला अवकाळी मुसळधार पावसाने पहाटेच्या सुमारास रंग दाखवले. त्यानंतर सायंकाळी चिपळूण, संगमेश्‍वर, लांजा, रत्नागिरीसह राजापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

रत्नागिरी तालुक्यात बसणी, नेवरे, गणपतीपुळे, करबुडे, वेतोशी, नेवरेत तर लांजा तालुक्यात वेरळ, शिपोशी, कोचरी, सालपे, पालु, केळवली, माचाळ, हुंबरवणे, चिंचुरटी या भागात गारांचा पाऊस झाला. या पावसाचा फटका हापूसला बसला आहे. याच कालावधीत आंबा तयार होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

गारा थेट आंब्यावर पडल्याने डाग पडले आहेत. काही ठिकाणी कैरीची गळ झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील क्षेत्र सर्वाधिक आहे. अचानक पडलेल्या पावसाने झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात १०० हेक्टरचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका हापूसला बसला असून काजू बी पावसामुळे गळून गेल्या आहेत. रब्बी हंगामावरही
याचा परिणाम झाला आहे. सुमारे दहा हेक्टरवरील भाजीपाला लागवडीचे नुकसान झाले आहे.

याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घारपडे म्हणाले की, पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्व्हे केला जात आहे. त्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. आंबा, काजूसह रब्बीतील काही पिकांना पावसाचा फटका बसलेला आहे. एकत्रित अहवाल शासनाकडे पाठविला जाईल.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...