वाशीम जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना ६.७७ कोटींची मदत  

वाशीमजिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने सहा कोटी ७७ लाख ४२ हजार रुपयांचा निधी शासनाने जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे.
गारपीट, अवकाळी नुकसानग्रस्तांना ६.७७ कोटींची मदत   Hail, untimely damage 6.77 crore assistance
गारपीट, अवकाळी नुकसानग्रस्तांना ६.७७ कोटींची मदत   Hail, untimely damage 6.77 crore assistance

वाशीम : जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने सहा कोटी ७७ लाख ४२ हजार रुपयांचा निधी शासनाने जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची वाटप करताना प्रचलित नियमानुसार शेती/बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानीकरिता मदत ही ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार या मदतीचे वाटप केले जाणार आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यात मदतीची ही रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. पिकांच्या नुकसानीबाबत मदतीची रक्कम संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करताना मदतीच्या रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली सहकार विभागाच्या आदेशाशिवाय करता येणार नाही. मार्च, एप्रिल आणि मे या कालावधीत आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तसेच जुलै महिन्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी १ कोटी ५३ लाख रुपये निधीदेखील मंजूर झाला आहे. नैसर्गिक आपत्तीने बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीमुळे दिलासा  मिळणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com