Agriculture News in Marathi Hail, untimely damage 6.77 crore assistance | Agrowon

वाशीम जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना ६.७७ कोटींची मदत  

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021


वाशीम जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने सहा कोटी ७७ लाख ४२ हजार रुपयांचा निधी शासनाने जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे.

वाशीम : जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने सहा कोटी ७७ लाख ४२ हजार रुपयांचा निधी शासनाने जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची वाटप करताना प्रचलित नियमानुसार शेती/बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानीकरिता मदत ही ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार या मदतीचे वाटप केले जाणार आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यात मदतीची ही रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.

पिकांच्या नुकसानीबाबत मदतीची रक्कम संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करताना मदतीच्या रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली सहकार विभागाच्या आदेशाशिवाय करता येणार नाही. मार्च, एप्रिल आणि मे या कालावधीत आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तसेच जुलै महिन्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी १ कोटी ५३ लाख रुपये निधीदेखील मंजूर झाला आहे. नैसर्गिक आपत्तीने बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीमुळे दिलासा 
मिळणार आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
शेततळ्याच्या अनुदानासाठी नगरला सर्वाधिक...नगर ः नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या...
कृषिपंपांची वीजतोडणी मोहीम तत्काळ...हिंगणा, जि. नागपूर : महावितरण कंपनीने कृषिपंपाचे...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत...जलालखेडा, जि. नागपूर : खरीप हंगाम सन २०२१-२२ ला...
अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग,...नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास...नाशिक : कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण...
कृषिमंत्र्यांच्या तालुक्याची अतिवृष्टी...नाशिक: जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान...
यवतमाळ : पाणंद रस्त्यांची मोहीम अर्धवटयवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाणंद रस्ते अतिशय...
सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या...सोलापूर ः जिल्ह्याच्या विविध भागांतील...
सोलापूर जिल्ह्यात फळपीक विम्याचा लाभ...सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी २०...जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोंडलेचा १७० कोटींचा निवाडा मंजूरचिमठाणे, जि. धुळे : शिंदखेडा व धुळे तालुक्यांना...
जळगाव जिल्ह्यात भरडधान्य खरेदी योजनेचा...जळगाव ः जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना...
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज...नाशिक : निफाड तालुक्यात मका व सोयाबीन काढणीचे काम...
मेशी येथे आधारभूत खरेदी किंमतकडे...मेशी, ता. देवळा : आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत...
गावकऱ्यांच्या श्रमामुळे ‘पद्मश्री’ :...नगर : ‘‘राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर...
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला...बुलडाणा : कापूस-सोयाबीन उत्पादकांचे प्रश्‍न,...
बारावीच्या परीक्षेसाठी आजपासून अर्ज...मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च...
जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले बर्लिन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत...
मुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २...मुंबई : बुधवारच्या तुलनेत मुंबईत कोविड बाधित...
चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर...चेन्नई ः तमिळनाडूवर अतिवृष्टीचे संकट घोंघावू...