राज्यात गारठा पुन्हा वाढणार 

अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. २३) दक्षिण कोकणातील जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे.
Hail will grow again in the state
Hail will grow again in the state

पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. २३) दक्षिण कोकणातील जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे. तर उद्यापासून (ता. २४) राज्याच्या किमान तापमानात घट होत गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  पश्‍चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे राजस्थान आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आज (ता. २३) उत्तरेकडील राज्यामध्ये विजांसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. उद्या (ता. २४) वायव्य भारताच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.  अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान झाले आहे. आज (ता. २३) कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शनिवारी (ता. २२) धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांगली येथे उच्चांकी ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

शनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३१.८ (१२.९), धुळे ३१ (१०), जळगाव - (१५.४), कोल्हापूर ३३.२ (१७), महाबळेश्‍वर २७ (१३.४), मालेगाव २९.६ (१२.४), नाशिक २७.७ (१४.४), निफाड २६.६ (१०.१), सांगली ३४.६ (१६), सातारा ३२.९ (१४.२), सोलापूर ३४ (१४.५), सांताक्रूझ २८.५ (१९.८), अलिबाग २८.१ (-), डहाणू २६.७ (१९.२), रत्नागिरी ३०.७ (१९.३), औरंगाबाद ३०.६ (१४.५), नांदेड ३१.२ (१५.०), उस्मानाबाद - (१६.९), परभणी ३०.६ (१४.१), अकोला ३१.१ (१४.७), अमरावती २९ (१२.५), बुलडाणा २९.५ (१४.८), ब्रह्मपुरी २९.३ (१४.१), चंद्रपूर २८.८ (१३.८), गडचिरोली ३० (१३.२), गोंदिया २८.४ (१०.५), नागपूर २९.४ (१२.०), वर्धा २९.९ (१२.२), वाशीम ३१.५ (१३), यवतमाळ ३०.५ (१३).   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com