अमरावती जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांसाठी ६७ कोटींसाठीचा प्रस्ताव

अमरावती जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांसाठी ६७ कोटींसाठीचा प्रस्ताव
अमरावती जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांसाठी ६७ कोटींसाठीचा प्रस्ताव

अमरावती : जिल्ह्यात नववर्षाच्या सुरुवातीला २ जानेवारी रोजी तीन तालुक्यांत गारपिटीची नोंद झाली होती. यामुळे सुमारे ६८ हजार १७३ हेक्‍टरवरील पीक बाधित झाले असून त्याकरिता सुमारे ६६ कोटी ९१ लाख २४ हजार रुपयांच्या भरपाईचा  प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे.  खरिपाच्या सुरुवातीला कमी आणि त्यानंतर धो-धो पाऊस बरसला. काही भागांत काढणीस आलेल्या सोयाबीनला पावसाचा फटका बसत उत्पादकता प्रभावित झाली. त्यानंतर तुरीचे देखील पावसाने नुकसान केले. कापूसही ओला झाल्याने त्याची प्रत खालावली. खरिपात संकटाचा सामना शेतकऱ्यांनी केला. खरिपात १८ ते २८ ऑक्‍टोबर दरम्यान ८० टक्‍के क्षेत्रातील पिके बाधित झाली होती. त्यानंतर रब्बी हंगामातही संकटांची मालिका कायमच आहे.  २ जानेवारी रोजी तिवसा, मोर्शी व वरुड तालुक्यांत अवकाळी पाऊस व गारपीट झाली. रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांसह कपाशी व संत्र्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले. महिला व बालविकास मंत्री तसेच अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी पहिल्यांदाच मतदारसंघात पोचल्यानंतर बाधित क्षेत्राची पाहणी केली. महसूल यंत्रणेला सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले. त्यानुसार तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांनी संयुक्‍त सर्वेक्षण केले. यामध्ये तिवसा, मोर्शी व वरुड या तीन तालुक्‍यांत ७६ हजार २०७ शेतकऱ्यांच्या एक लाख १८ हजार ४५२ हेक्‍टरपैकी ६८ हजार १७३ क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्‍क्‍यांवर नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. या बाधित क्षेत्रासाठी एनडीआरएफच्या निकषानुसार ६६ कोटी ९१ लाख २४ हजार रुपयांच्या निधीचा मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.  तालुकानिहाय्य बाधित क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)  तिवसा ः ३१७४.१८  मोर्शी ः ३७०५४.८८  वरुड ः २७९७४.५०  एकूण ः ६८१७३.५६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com