घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा तडाखा 

कांदा तीन एकर, पपई दोन एकर यांच्यासह रोपे ठिंबक सिंचन, खते किडनाशकासह मोठा खर्च केला. मोसंबीचा मृग बहार काढण्यात आला नाही. जो नवीन फुटलेला आंब्या आणि मोसंबीचे गारपीटीने नुकसाने जाले. अर्धा एकर दोडका पिकाचे नुकसान झाले. परिसरात एकूण अंदाजे लाख दहा लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. - शरद चत्रभूज भुतेकर, शेतकरी, शिंदेवडगाव
crop damage
crop damage

घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने शेतकऱ्यांना आधीच संकटात टाकले आहे. त्यातच घनसावंगी तालुक्यात शुक्रवारी (ता.27) रात्री सात वाजेच्या दरम्यान झालेल्या गारपीटीसह वादळी वाऱ्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. भाजीपाल्यासह फळबागा व ऊसाचे नुकसान झाले. 

घनसावंगी तालुक्यातील शिंदेवडगाव, गुरूपिंपरी, रांजणी, अव्वलगाव बुद्रूक यासह इतर गावात सरफगव्हाण, यावलपिंपरी, यावलपिंपरी तांडा, चित्रवडगाव, देवळी परतूर, देवळी यासह इतर गावांत गारपीट झाली. यात रस्त्यांवर अक्षरक्ष गारांचा सडा पडला होता. सध्या उशिराने पेरलेल्या गहु, ज्वारी पिकांची काढणी सुरू होती. या वादळामुळे काढणी केलेले गहू, ज्वारीचा कडबा अक्षरक्ष अस्ताव्यस्त होवून पाऊस व गारपीठीमुळे भिजला. शिवाय गहू व ज्वारी काळी पडण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली. 

याचबरोबर या गारपीटीमुळे मोसंबीचा आंब्या व मृग बहार संपूर्णपणे गळाला. पपई व कांदा या पिकाचे नुकसान झाले. परिसरातील अनेक लिंबाचे झाडे कोसळली. ऊस पिकाचे सर्व पाने गळून पडली. यामुळे उसाच्या वाढीवर परिणाम होवून उत्पन्नात घट होणार आहे. मागील सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर रब्बी हंगामातही गव्हावंर खोडअळी, हरभऱ्यावर अळी, ज्वारीवर चिटका असे रोगांचे संकट आले होते. मागील महिन्यात ही गारपीटीचा फटका काही गावांना बसला होता.  प्रतिक्रिया पाच एकरावर कारल्याचे पिक घेतले. परंतू कोरोना संसर्गाच्या भितीमुळे तोडणी व विक्री लांबली. त्यात या गारपीटीमुळे सर्व तारांसह कारल्यासाठी केलेला मडप खाली आला. आता काहीच शिल्लक राहीले नाही.  - सखाराम बाजीराव तेलवडे, शेतकरी, शिंदेवडगाव   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com