गोंदियात अवकाळी पावसासह बरसल्या गारा

chilli damage
chilli damage

गोंदिया ः शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सोमवारी (ता. २४) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर गारांचा पाऊसही बरसल्याने खरीप गमावलेल्या शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही अडचणीत आला आहे. गोंदियासह सालेकसा, तिरोडा, आमगाव, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव या तालुक्‍यांतही गारपीट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.  विदर्भात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. त्यानुसार सोमवारी (ता. २४) सायंकाळी अचानक आभाळ भरून येत पावसाला सुरुवात झाली. एक तास धो-धो पाऊस पडल्यानंतर गारपिटीची देखील नोंद झाली. खरीप हंगामात अवकाळी पावसाने पिकांची दाणादाण उडाली होती. त्यानंतर आता रब्बी हंगामात पाऊस आणि गारपीट होत असल्याने त्याचा फटका गहू, हरभरा व भाजीपाला पिकांना बसला आहे. तिरोडा तालुक्‍यात वीजपुरवठा देखील खंडित झाल्याने नागरिकांच्या समस्येत आणखीच भर पडली. १५ हजार हेक्‍टरवर गहू, हरभरा लागवड असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात आजही कौलारू घरांची संख्या अधिक आहे. गारपिटीमुळे अशा घरांचेही नुकसान झाले. गारपीट झाल्याने अनेक पक्ष्यांचा देखील मृत्यू झाला. उघड्यावरील धान भिजले : जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धानाची खरेदी होत आहे. शासनाने २५०० रुपयांपर्यंतचा दर दिल्याने या केंद्रावरील आवक वाढली आहे. त्यातच आदिवासी विकास महामंडळ तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्या केंद्रावरील पाच लाख क्‍विंटल उघड्यावर असून यातील मोठ्या प्रमाणावरील धान भिजल्याचे सांगितले जाते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com