वादळी पावसासह गारपिटीचा इशारा

गारपीट
गारपीट

पुणे : सूर्य तळपला असतानाच राज्यावर पूर्व मोसमी पावसाच्या ढगांची छाया आहे. आजपासून (ता.१४) राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. तर सोमवारी (ता. १५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वाऱ्यासह, गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वरच राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.  सूर्य चांगलाच तापदायक ठरल्याने चंद्रपूर जगातील सर्वांत उष्ण ठिकाण ठरले आहे. चंद्रपूर येथे तापमानाचा पारा हंगामातील उच्चांकी ४५.२ अंशांवर पोचला होता. शनिवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे ४४ अंश सेल्सिअस, तर ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला, अमरावती वर्धा, परभणी, नांदेड येथेही तापमान ४३ अंशांवर असून, राज्यात अनेक ठिकाणी ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. 

मध्य प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून मध्य महाराष्ट्र, विदर्भात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. शुक्रवारी सायंकाळनंतर नाशिक, सोलापूर, नागपूरसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने शिडकावा केला. मंगळवारपर्यंत (ता. १६) राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. 

शनिवारी (ता. १३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.२ (२.६), नगर ४२.७ (३.४), धुळे ४२.०, जळगाव ४२.६ (२.०), कोल्हापूर ३९.८ (३.०), महाबळेश्वर ३६.२ (४.५), मालेगाव ४२.४ (२.५), नाशिक ३९.९ (२.२), सांगली ४१.२ (३.०), सातारा ४०.१ (३.४), सोलापूर ४३.१(३.१), डहाणू ३४.५ (२.०), सांताक्रूझ ३३.३ (०.७), रत्नागिरी ३३.६ (१.६), औरंगाबाद ४१.२ (२.७), बीड ४२.६ (३.३), नांदेड ४३.० (२.०), उस्मानाबाद ४३.२ (४.९), परभणी ४३.० (३.०), अकोला ४३.९ (३.२), अमरावती ४३.६ (२.४), बह्मपुरी ४४.२ (३.७), चंद्रपूर ४४.० (२.६), गोंदिया ४०.५ (०.३), नागपूर ४१.८ (१.३), वाशीम ४२.०, वर्धा ४३.३ (२.२), यवतमाळ ४२.५ (२.२).  साताऱ्यात अनेक ठिकाणी गारपीठ सातारा जिल्ह्यात शनिवारी (ता.१३) अनेक ठिकाणी गारा, वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. कोरेगाव तालुक्यातील जरडेश्वर, करंजखोप, जावली तालुक्यातील मेढा येथे गारांसह पाऊस झाला. कास, गागठाणे, वरणे, भुईंज, पुसेगाव, पाचगणी, जांबखुर्दे परिसरात दमदार पाऊस झाला आहे.  उष्ण ठिकाणे ब्रह्मपुरी ४४.२  चंद्रपूर ४४.०  अकोला ४३.९  अमरावती ४३.६   वर्धा ४३.३  परभणी ४३.०  नांदेड ४३.०  नगर ४२.७   बीड ४२.६  जळगाव ४२.६  यवतमाळ ४२.५ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com