महिनाअखेरीस गारपिटीची शक्यता

पुणे: राज्याच्या तापमानात वाढ होत असतानाच, पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. मंगळवारपासून (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. महिना अखेरीस राज्याच्या अनेक भागांत गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उन्हाचा चटकाही वाढल्याने बहुतांशी ठिकाणी तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले आहे.
sector
sector

पुणे: राज्याच्या तापमानात वाढ होत असतानाच, पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. मंगळवारपासून (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. महिना अखेरीस राज्याच्या अनेक भागांत गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उन्हाचा चटकाही वाढल्याने बहुतांशी ठिकाणी तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले आहे.  राज्यात उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. शुक्रवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३८.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे, सांगली, सोलापूर येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तर, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले आहे. दिवसाचे कमाल तापमान वाढले असले तरी किमान तापमानात मात्र थोडीशी घट झाल्याचे दिसून आले. उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथे नीचांकी १०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.    बंगालच्या उपसागरात केंद्रभागी अधिक दाब असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याने पूर्व आणि मध्य भारतात बाष्पाचा पुरवठा होत आहे. यातच विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापसून ओडिशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे पूर्व आणि मध्य भारतात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २१) पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.   शुक्रवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.१(१४.३), धुळे ३७.५ (१२.५), जळगाव ३६.६(१९.०), कोल्हापूर ३६.५(२१.७), महाबळेश्‍वर ३२.१(१६.९), मालेगाव -(१८.०), नाशिक ३४.८(१६.४), निफाड ३४.५(१०.८), सांगली ३७.४(२०.०), सातारा ३६.५(१७.१), सोलापूर ३७.८(२१.५), अलिबाग ३१.० (२०.६), डहाणू ३२.६ (२१.९), सांताक्रूझ ३३.१(२२.५), रत्नागिरी ३५.३(१९.४), औरंगाबाद ३६.०(१८.१), परभणी ३६.८(१७.५), नांदेड ३५.५(२१.५), उस्मानाबाद ३६.५(१९.०), अकोला ३८.० (२०.१), अमरावती ३६.६ (१९.०), बुलडाणा ३३.० (१९.६).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com