agriculture news in Marathi hailstorm possibility in Vidarbha Maharashtra | Agrowon

विदर्भात गारपिटीची शक्यता

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

पुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने विदर्भात शुक्रवारी (ता.१३) व शनिवारी (ता.१४) तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. तर मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यामध्ये मेघगर्जनेसह, पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे विदर्भातही तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.

पुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने विदर्भात शुक्रवारी (ता.१३) व शनिवारी (ता.१४) तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. तर मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यामध्ये मेघगर्जनेसह, पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे विदर्भातही तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तिव्रता कमी आहे. मात्र, त्याचा काही प्रमाणात परिणाम गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या वातावरणावर होत आहे. त्यामुळे राज्यातील थंडी कमी झाली असली तरी पुन्हा राज्यात थंडी हातपाय पसरविण्यास सुरुवात करण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस नागपूर येथे १३.१ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ गोदिया, चंद्रपूर या भागातही किचिंत थंडी असून किमान तापमान १३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. 

कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा या भागात हवामान कोरडे होते. त्यामुळे या भागात किंचित थंडी असून काही ठिकाणी थंडी कमी झाली होती. त्यामुळे तापमानात चढउतार असल्याची स्थिती होती. खान्देशात १३ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. मध्य महाराष्ट्रात १४ ते १८, कोकणात २१ ते २३ तर मराठवाड्यात १४ ते १७ अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. मात्र, पुढील काही दिवस थंडीत वाढ होण्याची शक्यता असून किमान तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बुधवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः नगर १७.५ (६), अकोला १४.९ (१), अलिबाग २२.४ (३), अमरावती १५.०, औरंगाबाद १४.३ (३), बीड १७.६ (६), बुलढाणा १६.६ (२), चंद्रपूर १३.०, डहाणू २२.१ (३), गोंदिया १३.८ (१), जळगाव १५.६ (१), धुळे १६.०, कोल्हापूर १८.६ (३), महाबळेश्वर १४.६ (१), मालेगाव १७.० (६), मुंबई २१.८ (३), नागपूर १३.१, नांदेड १६.० (३), नाशिक १५.४ (५), निफाड १३.२, परभणी १४.६ (१), लोहगाव १८.० (६), पाषाण १७.६ (६), पुणे १६.० (५), रत्नागिरी २१.७ (२), सांगली १८.० (३), सातारा १६.० (३), सोलापूर १८.५ (३), ठाणे २३.०, वर्धा १३.८ (-१), यवतमाळ १४.० (-१) 


इतर अॅग्रो विशेष
बदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत...
बोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बागढवळपुरी (जि. नगर) येथील सुखदेव कचरू चितळकर यांनी...
खानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा...जळगाव  : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर...
हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण)...
बाजार समित्यांत शेतकऱ्यांना थेट मतदान...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
नीरेपासून साखरनिर्मितीचा रत्नागिरीत...रत्नागिरी ः नारळाच्या झाडातून काढल्या जाणाऱ्या...
परवाना निलंबनातही बिनदिक्कत खतविक्रीपुणे : ‘नियमांची पायमल्ली करून विदेशातून...
शेतकरी प्रश्न सुटण्यासाठी...मुंबई : राज्यात तालुकास्तरावर उद्यापासून...
शनिवारपासून किमान तापमानात घट होण्याची...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
विमाभरपाई प्रक्रिया रिमोट सेन्सिंगशी...पुणे : पीककापणी प्रयोगाच्या आधारावर पंतप्रधान...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
मटण दरवाढीचा लाभ पशुपालकांना कधी?शेळीपालनाबरोबरच मेंढीपालनातही समस्यांचा ऊहापोह...
जैवविविधतेची नोंदणी गांभीर्याने घ्याराज्यातील खेड्यापाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
‘पोकरा’अंतर्गत तांत्रिक सहकार्यासाठी...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या...
अनियमित थंडी ऊस रिकव्हरीच्या मुळावरकोल्हापूरः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही ऊस...
देशात केवळ ३५ तेलबिया हबनिर्मितीनवी दिल्ली: देशातील तेलबिया उत्पादन वाढावे आणि...
राज्यात गारठा कमी, उकाडा वाढलापुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
अलिबागचा पांढरा कांदा ‘जीआय’च्या वाटेवरपुणे : औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या...
बेकायदा विदेशी खत आयातीचे परवाने रद्दपुणे : विद्राव्य खतांची बेकायदा आयात व विक्री...
‘सुधाकर सीडलेस’ द्राक्ष वाणाचे...नाशिक : शिवडी (ता. निफाड) येथील शेतकरी सुधाकर...